Monali Thakur: प्रसिद्ध बॉलिवूड पार्श्वगायिका मोनाली ठाकूरने (Monali Thakur) आपल्या सुमधूर आवाजाने चाहत्यांची मनं जिंकली. अनेक सुपरहिट गाणी गाऊन या गायिकेने प्रेक्षकांचं पूरेपूर मनोरंजन केलं आहे. दरम्यान, मोनाली ठाकूर संदर्भात एक चिंता वाढणारी माहिती समोर आली आहे. पश्चिम बंगाल येथील दिनहाटा महोत्सवामध्ये लाईव्ह कॉन्सर्ट दरम्यान तिची तब्येत बिघडल्याचं वृत्त समोर येत आहे. भर कॉन्सर्टमध्ये श्वास घेण्यास त्रास होत असल्याने तिला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आल्याची माहिती मिळते आहे. यामुळे मोनाली ठाकूरचे चाहते देखील चिंतेत आहेत.
नेमकं प्रकरण काय?
पश्चिम बंगाल येथील दिनहाटा महोत्सवात गाणं गात असताना अचानक मोनाली ठाकूरची तब्बेत बिघडली, बातम्या सगळीकडे दिसू लागल्या. त्यानंतर तेथील इव्हेंट मॅनेजमेंटकडून तत्काळ परफॉर्मन्स थांबवण्यात आला. परफॉर्मन्स करत असताना मोनाली ठाकूरला श्वास घेण्यास त्रास होत असल्याचं त्यांच्या लक्षात आलं. त्यानंतर क्षणाचाही विलंब न करत गायिकेला दिनहाटा येथील रुग्णालयात हलविण्यात आलं.
मोनाली ठाकूरबद्दल सांगायचं झालं तर तिने ‘सवार लूं’, ‘जरा जरा टच मी’, ‘मोह मोह के धागे’,‘बद्री की दुल्हनिया’ अशी अनेक हिट गाणी तिने गायली आहेत. तसेच ‘दम लगाके हैशा’ या चित्रपटातील ‘मोह मोह के धागे’ हे गाणं लोकप्रिय ठरलं. या गाण्यासाठी मोनाली राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार देखील मिळाला आहे.