Shreya Ghoshal Birthday : आपल्या सुमधूर गायिकिने चाहत्यांना मंत्रमुग्ध करणारी ही गायिका आज बॉलिवूडवर राज्य करतेय. गोड गळ्याची 'मेलोडी क्विन' अशी तिची जगभर ख्याती आहे. नेमकी कोण आहे ही गायिका, जाणून घेऊया.
आपल्या मंत्रमुग्ध आवाजाने सर्वांच्या मनावर मोहिनी घालणारी गायिका म्हणजे श्रेया घोषाल. आज श्रेया तिचा ४० वा वाढदिवस साजरा करतेय. तिच्या सुरेल गायकिने श्रेयाने असंख्य चाहत्यांच्या मनं जिंकली आहेत.
अगदी लहान वयातच तिने गायनाचे धडे गिरवायला सुरूवात केली. वयाच्या १६ व्या वर्षी श्रेयाने झी टीव्हीच्या बहुप्रतिष्ठित सिंगिग रिअलिटी शो 'सारेगमपा' चा खिताब जिंकून ट्रॉफीवर आपलं नाव कोरलं. साल २००० मध्ये झालेल्या या स्पर्धेची ती विजेती ठरली होती. आतापर्यंत तिने बॉलिवूड इंडस्ट्रीमध्ये अनेक सुपरहिट गाणी गायली आहेत.
अमेरिका सरकारकडून सन्मान -
२०१० मध्ये श्रेया घोषालचा अमेरिका सरकारकडून मोठा सन्मान मिळाला. विशेष म्हणजे अमेरिकेत दरवर्षी २६ जून रोजी 'श्रेया घोषाल डे' साजरा केला जातो. गायिका श्रेया घोषाल हिला अमेरिकेतील ओहायो राज्याकडून सन्मानित करण्यात आलं. याशिवाय ओहायोचे राज्यपाल टेड स्ट्रिकलँड यांनी २६ जून २०१० हा दिवस 'श्रेया घोषाल दिवस' म्हणून घोषित केला.
संजय लीला भन्साळी यांच्या 'देवदास' मुळे पालटलं नशीब -
श्रेयाने २००० मध्ये बॉलिवूडमध्ये प्ले बॅक सिंगर म्हणून पाऊल ठेवलं. प्रसिद्ध दिग्दर्शक संजय लीला भन्साळी यांच्या 'देवदास' या चित्रपटात तिला पहिल्यांदा गायनाची संधी मिळाली. श्रेयाने या चित्रपटात एकुण पाच गाणी गायली आणि ही सर्व गाणी सुपरहिट ठरली. या चित्रपटासाठी तिला पहिला राष्ट्रीय पुरस्कार देखील मिळाला होता. यानंतर तिने कधीच मागे वळून पाहिलं नाही.
पाहायला गेल्यास आतापर्यंत श्रेयाने एक हजाराहून अधिक बॉलिवूड गाणी गायली आहेत. यामध्ये 'डोला रे डोला', 'सिलसिला ये चाहत का', 'चिकनी चमेली', 'तेरी मेरी', 'तेरे लिए' यांसारख्या अनेक गाण्यांचा समावेश आहे.