Join us

पंतप्रधान मोदींना राखीने पाठवली सामानाची लिस्ट; अमेरिकेवरुन मागवल्या 'या' वस्तू

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 25, 2021 14:11 IST

Rakhi sawant : बेताल आणि वायफळ वक्तव्यांमुळे चर्चेत येणाऱ्या राखी सावंतने यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविषयी एक वक्तव्य केलं आहे.

ठळक मुद्देबिग बॉस १५ मध्ये राखी तिच्या पतीसोबत सहभागी होणार आहे?

बॉलिवूडची ड्रामा क्वीन अर्थात अभिनेत्री राखी सावंत सोशल मीडियावर कायमच चर्चेत असते. समाजात घडणाऱ्या प्रत्येक घटनेवर ती उघडपणे व्यक्त होत असते. यात अनेकदा तिच्या बेताल आणि वायफळ वक्तव्यांमुळेही तिची चर्चा होते. यामध्येच आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविषयी एक वक्तव्य केल्यामुळे ती चर्चेत आली आहे. राखीने चक्क पंतप्रधान मोदींकडे सामानाची लिस्ट पाठवली असून त्यांना अमेरिकेतून तिच्यासाठी काही वस्तू आणायला सांगितल्या आहेत.

सोशल मीडियावर सध्या राखीचा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ विरल भय्यानी यांच्या इन्स्टाग्रामवर शेअर करण्यात आला असून सध्या तुफान व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये राखीने चक्क पंतप्रधानांना तिच्यासाठी शॉपिंग करायला सांगितली आहे.

पंतप्रधान मोदी सध्या अमेरिका दौऱ्यावर आहेत. त्यामुळे राखीने तिच्यासाठी शॉपिंग करण्याची विचित्र मागणी मोदींकडे केली आहे.  नमस्कार मोदीजी, तुम्ही अमेरिकेला गेलात हे ऐकून आनंद झाला. तेथे राहणाऱ्या सगळ्या भारतीयांना नमस्कार सांगा. तिथल्या प्रत्येक भारतीयावर माझं प्रेम आहे हे सुद्धा सांगा आणि..मोदीजी ज्यावेळी तुम्ही तिकडून परत याल त्यावेळी माझ्यासाठी काहीतरी शॉपिंग नक्की करा, असं राखी म्हणाली.

'नाटक अन् चित्रपट तुम्हाला नकोय का?' आस्ताद काळेचा प्रेक्षकांना प्रश्न

बिग बॉस १५ मध्ये पतीसोबत सहभागी होणार राखी?

गेल्या काही दिवसांपासून बिग बॉस १५ ची जोरदार चर्चा सुरु आहे. या नव्या पर्वात राखी तिच्या पतीसोबत म्हणजेच रितेशसोबत सहभागी होणार असल्याचं म्हटलं जात आहे. 

टॅग्स :राखी सावंतसेलिब्रिटीटिव्ही कलाकार