Pornography Case; शिल्पा शेट्टीचा पती राज कुंद्राला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी

By ऑनलाइन लोकमत | Published: July 27, 2021 01:30 PM2021-07-27T13:30:09+5:302021-07-27T13:33:49+5:30

पोर्नोग्राफी प्रकरणात राज कुंद्रा अद्यापही दिलासा मिळालेला नाही. राज कुंद्राच्या वकिलाने त्याच्या जामीनासाठी अर्ज केला होता...

Bollywood pornography case Businessman Raj kundra bombay high court | Pornography Case; शिल्पा शेट्टीचा पती राज कुंद्राला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी

Pornography Case; शिल्पा शेट्टीचा पती राज कुंद्राला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी

googlenewsNext

मुंबई - बॉलीवुड अ‍ॅक्ट्रेस शिल्पा शेट्टीचा पती आणि बिझनेसमन राज कुंद्राच्या अडचणी कमी होताना दिसत नाहीत. त्याच्यावर अश्लील फिल्म्स तयार करणे आणि त्या ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीज करण्याचा आरोप आहे. या प्रकरणात सातत्याने नव-नवे खुलासे समोर येत आहेत. आता न्यायालयाने त्याला 14 दिवसांच्या न्यायालयीन कोठडीत पाठवले आहे. (Pornography case Raj kundra sent to judicial custody for 14 days)

14 दिवसांच्या न्यायालयीन कोठडीत राहणार राज कुंद्रा -
पोर्नोग्राफी प्रकरणात राज कुंद्रा अद्यापही दिलासा मिळालेला नाही. आता त्याला न्यायालयीन कोठडीत पाठविण्यात आले आहे. राज कुंद्राला किला कोर्टाने 14 दिवसांच्या न्यायालयीन कोठडीत पाठवले आहे. याच बरोबर राज कुंद्राच्या वकिलांनी त्याच्या जामीनासाठी अर्ज केला आहे. चौकशी पूर्ण झाली आहे. त्यामुळे आता राज कुंद्राला जामीन मिळावा, असा या अर्जाचा आधार आहे. 

Pornography Case: राज कुंद्राशी संबंधित पॉर्न रॅकेट प्रकरणात शिल्पा शेट्टीच्या भूमिकेबाबत मोठा खुलासा; जाणून घ्या

पुलिसांनी केली 7 दिवसांच्या कोठडीची मागणी -
मुंबई पोलिसांनी राज कुंद्राची कोठडी 7 दिवसांसाठी वाढविण्याची मागणी केली. राज कुंद्राला 27 जुलैपर्यंत पोलीस कोठडीत पाठविण्यात आले होते. 

19 जुलैला झाली होती अटक -
या प्रकरणात राज कुंद्रासह एकूण 11 जणांना 19 जुलैला मुंबई पोलिसांनी पॉर्न फिल्म्सच्या व्यवसायाशी संबंधित असल्याच्या आरोपाखाली अटक केली होती. सांगण्यात येते, की या व्यवसायात राज कुंद्राने मोठा पैसा लावला होता आणि यातून तो मोठा नफाही कमवत होता. 

Raj Kundra Case: पोलिसांच्या रेडदरम्यान रडली होती शिल्पा शेट्टी; राज कुंद्रासोबतही झाला होता वाद!

Read in English

Web Title: Bollywood pornography case Businessman Raj kundra bombay high court

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.