सध्या बॉलिवूड अभिनेत्री कंगना राणौतची चर्चा देशभरात आहे. बॉलिवूडमध्ये आपला डंका गाजवल्यानंतर कंगना आता राजकारणात उतरली आहे. कंगना ही हिमाचल प्रदेशातील मंडी लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढत आहे. कंगना राणौत स्पष्टवक्ती आहे. तिचे मत ती बिनधास्तपणे मांडते. कंगना तिच्या बेधडक आणि निर्भिड स्वभावासाठी लोकप्रिय आहे. पण, तुम्हाला माहितेय अशा काही गोष्टी आहेत, ज्यांची कंगनाला भीती वाटते.
फोबिया (Phobia) म्हणजे भीती. भीती काय असते हे सर्वांना माहिती आहे. कारण, सर्वांना कशा ना कशाची भीती वाटतचं असते. कंगनालाही एका गोष्टीचा फोबिया आहे. एका मुलाखतीत तिनं सांगितलं होतं की, मला गाडी चालवण्याची प्रचंड आवड आहे. पण भीती वाटते. एकदा मी गाडी चालवण्याचा प्रयत्न केला होता आणि रिक्षाला ती धडकली. पण त्या घटनेनंतर गाडीचं स्टिअरिंग पकडायला सुद्धा भीती वाटते, असं वाटतं मी पुन्हा एखाद्या गाडीला ठोकून देईल'.
कंगनाला गाडी चालवण्याची भीती असली तरी ती महागड्या गाड्यांची शौकीन आहे. नुकतंच कंगाना हिनं तब्बल 2.43 कोटी रुपयांची नवी मर्सिडीज मेबॅक जीएलएस कार (Mercedes-Maybach GLS) खरेदी केली. या गाडीची किंमत तब्बल 2.43 कोटी ऐवढी आहे. ही भारतात विकली जाणारी सर्वांत महागडी कार आहे. याशिवाय तिच्याकडे BMW 7-Series, Mercedes Benz GLE SUV, Audi Q3 आणि Mercedes Maybach S-Class सारख्या लक्झरी कार आहेत.
बॉलिवूडमध्ये कोणीही गॉडफादर नसताना स्वत:ची एक वेगळी ओळख निर्माण करण्यात कंगना यशस्वी झाली. आता राजकारणात तिला किती यश मिळतं हे लवकरच स्पष्ट होईल. कंगनाच्या फिल्मी लाइफबद्दल बोलायचं झाले तर ती शेवटची 'तेजस' चित्रपटात दिसली होती. हा चित्रपट ऑक्टोबर 2023 मध्ये थिएटरमध्ये प्रदर्शित झाला होता, पण तो फ्लॉप ठरला. आता ती 14 जूनला प्रदर्शित होणाऱ्या 'इमर्जन्सी'मध्ये दिसणार आहे.