Join us

हैदराबाद घटनेने बॉलिवूडही संतापले !

By रवींद्र सखाराम मोरे | Published: December 02, 2019 12:42 PM

या घटनेबाबत ऐकल्यानंतर अक्षय कुमारसह बºयाच स्टार्सने ट्विटरच्या माध्यमातून आपला संताप व्यक्त केला आहे.

-रवींद्र मोरे 

हैदराबादमध्ये एका महिला पशु चिकित्सकसोबत झालेल्या बलात्कार आणि खूनाच्या घटनेने संपूर्ण देश संतापात आहे. प्रत्येकजण या महिलेच्या आरोेपींना कठोर शासनाची मागणी करत आहेत. सोशल मीडियापासून ते रस्त्यांपर्यंत या घटनेचा तीव्र निषेध केला जात आहे. या चकित करण्याºया घटनेने बॉलिवूडदेखील हादरला आहे. या घटनेबाबत ऐकल्यानंतर अक्षय कुमारसह ब-याच स्टार्सने ट्विटरच्या माध्यमातून आपला संताप व्यक्त केला आहे.  

* अक्षय कुमार

अक्षयने ट्विटरवर संताप व्यक्त करत म्हणाला की, ‘मग ही हैदराबाद रेप केस असो, तामिळनाडू रेप केस असो वा रांचीमध्ये लॉ स्टुडंट्ससोबत झालेला गॅँगरेप असो, आपण एक समाजाच्या हिशोबाने हारत आहोत. देशाला हादरवणाºया निर्भया घटनेला सात वर्ष झाले आहेत आणि आमची नैतिकता  अजूनही ढिसूळ आहे. आम्हाला कठोर नियमांची अत्यंत गरज आहे. हे आता ‘बंद’ व्हायला हवे.  

* फरहान अख्तर

अभिनेता फरहान अख्तरने लिहिले आहे की, ‘त्या लोकांनी महिला डॉक्टरसोबत जे केले, त्यामुळे एक गोष्ट स्पष्ट होते की, अशा प्रकरणात त्वरित निर्णय आणि न्याय न करुन आपण आपल्या समाजाला कशाप्रकारे असुरक्षित बनवून ठेवले आहे. या दु:खद घटनेत माझ्या संवेदना त्या कुटुंबासोबत आहेत.  

* शबाना आझमी

 

शबाना आझमी म्हटल्या की, ‘या घटनेशी संबंधीत त्या दुष्कृत्य करणा-या अमानवी लोकांना कठोर शासन व्हायला हवे. मला त्यांच्या कुटुंबासाठी दु:ख आहे आणि हे दु:ख आहे त्यासाठी की, आपल्या समाजाच्या काही घटकाला काय होत चालले आहे?’

* ऋषि कपूर

 

ऋषि कपूरनेही या घटनेबाबत ट्विटरद्वारे तिव्र संताप आणि दु:ख  व्यक्त करत कठोर शिक्षेची मागणी केली आहे. त्यांनी लिहिले आहे की, अशा दुष्कृत्य करणाºया नालायक लोकांसाठी कठिणातली कठिण शिक्षा मिळावी, अर्थात त्यांना मृत्यूदंड मिळावा अशी मागणी ऋषि कपूर यांनी केली आहे.  

* मधुर भांडारकर

रकुल प्रितनेही सदर घटनेचा तिव्र शब्दात निषेध व्यक्त केला आहे. तिने लिहिले आहे की, मला समजत नाहीय की, मी या घटनेबाबत काय प्रतिक्रिया देऊ. आता पाणी डोक्यावरुन जात आहे. हद्द झाली आता. लवकरच काहीतरी करावे लागणार आहे. एवढे स्वातंत्र्य कसे? त्यांना अद्दल घडवावीच लागेल.

टॅग्स :मधुर भांडारकर ऋषी कपूरशबाना आझमी