बॉलिवूडने शशी कपूर यांच्या ‘या’ मुलाला नाकारले; पण कर्तृत्वाने बनला करोडपती!
By ऑनलाइन लोकमत | Published: March 18, 2018 11:15 AM
आपल्या अभिनयाने अनेक भूमिका अजरामर करणाºया दिवंगत अभिनेते शशी कपूर यांची आजही प्रेक्षकांमध्ये प्रचंड लोकप्रियता आहे. शशी कपूर यांनी ...
आपल्या अभिनयाने अनेक भूमिका अजरामर करणाºया दिवंगत अभिनेते शशी कपूर यांची आजही प्रेक्षकांमध्ये प्रचंड लोकप्रियता आहे. शशी कपूर यांनी ४ डिसेंबर २०१७ रोजी या जगाचा निरोप घेतला. परंतु आजही प्रेक्षक त्यांच्या चित्रपटांमधील गाणी आणि डायलॉगवर चर्चा करताना बघावयास मिळतात. आज त्यांचा जन्मदिवस आहे. शशी कपूर यांनी १९५८ मध्ये जेनिफर केंडलशी विवाह केला होता. शशी आणि जेनिफर यांना तीन मुले आहेत. कुणाल कपूर, करण कपूर आणि संजना कपूर अशी त्यांची नावे आहेत. शशी बॉलिवूडमधील सुपरस्टार्सपैकी एक होते. परंतु त्यांच्या तिन्ही मुलांनी बॉलिवूडच्या वाटेवर न जाता वेगळ्या क्षेत्रात करिअर करण्याचा विचार केला. वास्तविक बरेचसे असे स्टार किड्स आहेत, ज्यांनी आपल्या आई-वडिलांच्या पावलावर पाऊल ठेवणे पसंत केले. परंतु शशी कपूर यांच्या मुलांनी वेगळ्या मार्ग निवडला. त्यामध्ये करण कपूर यांनी स्वकर्तत्वाने लोकप्रियता मिळविली. एका जमान्यात शशी कपूूर यांच्याशी चित्रपट करण्यासाठी निर्मात्यांची रांग लागायची. परंतु शशी यांचा मुलांना याच इंडस्ट्रीने सपशेल नाकारले. विशेष म्हणजे त्यांच्या मुलांना कोणी छोट्या-मोठ्या भूमिकाही आॅफर केल्या नाहीत. जेव्हा इतरांकडून प्रतिसाद मिळत नाही, तेव्हा शशी कपूर यांनी स्वत:च आपल्या मुलांना लॉन्च करण्याचा विडा उचलला होता. परंतु नशिबाने त्यांना अपेक्षित साथ दिली नाही. वास्तविक श्याम बेनेगलच्या ‘जुनून’ या चित्रपटात करणला अभिनयाच्या माध्यमातून आपल्या प्रतिभा दाखविण्याची संधी मिळाली होती, परंतु नशिबाने साथ दिली नाही. पुढे काही काळ वडिलांच्या स्टारडमवर त्याला चित्रपट मिळत गेले. ‘सल्तनत’ या चित्रपटाच्या माध्यमातून करण कपूरने मेनस्ट्रीम सिनेमामध्ये एंट्री केली, परंतु या चित्रपट अतिशय वाइट पद्धतीने फ्लॉप ठरला. खरं तर करणचा लूक हा एखाद्या सुपरस्टारप्रमाणे आहे, परंतु अशातही त्याला नशिबाने कधीच साथ दिली नाही. अखेर करणने चित्रपटांचा नाद कायमचा सोडून दिला. आपल्या फ्लॉप फिल्मी करिअरवरून निराश न होता, करणने आपल्यातील प्रतिभा ओळखली. पुढे त्याने फोटोग्राफी करीत एक उत्तम फोटोग्राफर म्हणून लोकप्रियता मिळविली. आज करणची गणना जगातील प्रसिद्ध फोटोग्राफरमध्ये केली जाते. करण आपल्या फोटोंचे प्रदर्शनही भरवीत असतो. आज करणची फोटोग्राफी सर्वत्र चर्चेचा विषय ठरते. लोक त्याच्याकडून फोटोग्राफी करून घेण्यास नेहमीच तयार असतात. यातून त्याने लोकप्रियता, प्रसिद्धी आणि पैसा असे सर्वकाही मिळविले आहे. इंडस्ट्रीमध्ये न राहूनही तो आज कोट्यवधी रूपयांच्या संपत्तीचा मालक आहे.