Join us

बॉलिवूड रिपोर्ट कार्ड 2019: वर्षाच्या पहिल्या तीन महिन्यातच स्टारच्या दमदार अभिनयाने भारावले प्रेक्षक!

By ऑनलाइन लोकमत | Published: April 04, 2019 2:08 PM

२०१८ च्या पहिल्या तीन महिन्यात चार चित्रपटांनी १०० कोटीची कमाई केली होती आणि संपूर्ण वर्ष प्रेक्षकांना उत्कृष्ट आशयाचे चित्रपट बघावयास मिळाले होते. या चित्रपटांपैकी काही चित्रपटात दिग्गज स्टार्स तर होतेच शिवाय काही चित्रपट तर विना स्टार्सही सुपरहिट झाले. २०१९ मध्येही हा ट्रेंड पुढे कायम होत असल्याचे दिसत आहे, कारण या वर्षाच्या सुरुवातीतदेखील काही मोठे स्टार्स एंटरटेनिंग कंटेंट आणि दमदार परफॉर्मन्सने बक्कळ कमाई करताना दिसत आहेत.

-रवींद्र मोरे२०१८ या वर्षाने सिद्ध करुन दाखविले होते की, जर वर्षाची सुरुवात चांगली राहिली तर संपूर्ण वर्ष उत्कृष्ट जाते. २०१८ च्या पहिल्या तीन महिन्यात चार चित्रपटांनी १०० कोटीची कमाई केली होती आणि संपूर्ण वर्ष प्रेक्षकांना उत्कृष्ट आशयाचे चित्रपट बघावयास मिळाले होते. या चित्रपटांपैकी काही चित्रपटात दिग्गज स्टार्स तर होतेच शिवाय काही चित्रपट तर विना स्टार्सही सुपरहिट झाले. २०१९ मध्येही हा ट्रेंड पुढे कायम होत असल्याचे दिसत आहे, कारण या वर्षाच्या सुरुवातीतदेखील काही मोठे स्टार्स एंटरटेनिंग कंटेंट आणि दमदार परफॉर्मन्सने बक्कळ कमाई करताना दिसत आहेत.* विक्की कौशल - उरीउरी चित्रपटातील विक्कीच्या दरदार परफॉर्मन्सने बॉलिवूडच्या आतापर्यंतच्या सर्वोत्कृष्ट ‘वॉर मुव्हिज’च्या यादीत या चित्रपटास उच्चस्थानी आणून ठेवले आहे. हा चित्रपट या वर्षाचा आतापर्यंतचा सर्वात हिट चित्रपट आहे. या चित्रपटाने बॉक्स आॅफिसवर सुमारे २५० कोटीची कमाई करत प्रेक्षकांचे चांगलेच मनोरंजन केले आहे. हा चित्रपट भारतीय सैन्याने पाकिस्तानावर केलेल्या सर्जिकल स्टाईकवर आधारित आहे.* तापसी पन्नू - बदलास्पॅनिश चित्रपट ‘द इनव्हिजीबल गेस्ट’चा हिंदी रिमेक ‘बदला’ मध्ये नैनाची भूमिका साकारुन तापसीने सर्व चाहत्यांचे मन जिंकले आहे. या चित्रपटात तापसीचे परफॉर्मन्स खूपच दमदार आहे. विशेष म्हणजे काही सीन्समध्ये तिने तर अमिताभ बच्चन यांनादेखील टक्कर दिली आहे. हा एक सस्पेन्स थ्रिलर चित्रपट असून याचे दिग्दर्शन सुजॉय घोष यांनी केले आहे.* अभिमन्यु दसानी - मर्द को दर्द नहीं होताहा अभिमन्युचा डेब्यू चित्रपट आहे आणि आपल्या पहिल्याच चित्रपटात त्याने दमदार परफॉर्मन्स देण्यात कोणतीच कसर सोडली नाही. यात त्याने सूर्याची भूमिका साकारली असून तो एक असा मुलगा आहे ज्याला कधीही दु:खाची जाणिव होत नाही. यात त्याचे अ‍ॅक्शन सीन्सदेखील जबरदस्त आहेत. विशेष म्हणजे अभिमन्यूने पहिल्याच चित्रपटात घेतलेली रिस्क कौतुकास्पद आहे.* रणवीर सिंह - गली बॉयरणवीरचे सर्वच चित्रपट हिट होताना दिसत आहेत. २०१८ मध्ये पद्मावत आणि सिम्बा सुपरहिट आणि ब्लॉकबस्टर चित्रपट दिल्यानंतर यावर्षाची सुरुवातदेखील रणवीरसाठी उत्कृष्ट ठरली. गली बॉय चित्रपटात मुरादची भूमिका रणवीरने अतिशय उत्कृष्टपणे साकारली आणि त्याचे हे परफॉर्मन्स यावर्षाचा अविस्मरणीय परफॉर्मन्स बनला आहे.* अजय देवगन - टोटल धमालया चित्रपटाने तर बॉक्स आॅफिससोबत प्रेक्षकांच्या मनावर धमालच केली आहे. विशेष म्हणजे हा मल्टी स्टारर चित्रपट असूनही यातील अजय देवगनची भूमिकाने प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवले. त्याच्या दमदार अभिनयाने प्रेक्षकांना अक्षरश: थिएटरच्या खुर्च्यांवर खिळवून ठेवले. या चित्रपटात अजय सोबतच माधुरी दीक्षित, अनिल कपूर, रितेश देशमुख, अरशद वारसी, जावेद जाफरी, संजय मिश्रा, जॉनी लिवर, बोमन इराणी आदी कलाकार आहेत.* अक्षय कुमार - केसरीअक्षय कुमार या चित्रपटाच्या माध्यमातून यावर्षी मोठ्यरा पडद्यावर शिख योद्धा इशार सिंह यांच्या भूमिकेत आला आणि आपल्या दमदार परफॉर्मन्सने सर्वांना चकित केले. हा चित्रपट सारागढी युद्धाशी प्रेरित आहे. केवळ २१ लोक १० हजार सैनिकांना कशाप्रकारे तोंड देतात, त्यांची शौर्यगाथा म्हणजे केसरी.

टॅग्स :बॉलिवूडउरीटोटल धमालगली ब्वॉयबदला