दाक्षिणात्य कलाविश्वातील लोकप्रिय अभिनेत्री समंथा रुथ प्रभू (samantha ruth prabhu) गेल्या काही दिवसांपासून सातत्याने चर्चेत येत आहे. कधी तिच्या प्रोफेशन लाइफमुळे तर कधी तिच्या पर्सनल लाइफमुळे. अलिकडेच समंथा आणि नागा चैतन्य या जोडीने कायदेशीरित्या घटस्फोट घेतला. मात्र, या घटस्फोटानंतर अनेकांनी समंथाला ट्रोल केलं. इतकंच नाही तर काहींनी तिच्याविषयी आक्षेपार्ह वक्तव्यदेखील केले. विशेष म्हणजे ही जोडी विभक्त होऊन आता बराच काळ लोटला आहे. मात्र, तरीदेखील त्यांच्याविषयी चर्चा होणं अद्यापही थांबलेलं नाही. यामध्येच एका नेटकऱ्याने समंथावर आक्षेपार्ह टीका केली असून समंथाने त्याला सडेतोड उत्तर दिलं आहे.
सध्या सोशल मीडियावर समंथाची एक पोस्ट व्हायरल होत आहे. या पोस्टमध्ये तिच्यावर चुकीच्या पद्धतीने टीका करणाऱ्याला तिने उत्तर दिलं आहे. अलिकडेच समंथाच्या ट्विटवर एका व्यक्तीने कमेंट केली होती. ही कमेंट पाहिल्यावर समंथाच्या रागाचा पारा चढला.
समंथा रुथ प्रभू एक घटस्फोटित सेकंड हँड आयटम आहे. जिने एका सभ्य पुरुषाचे टॅक्स फ्री ५० कोटी रुपये घेऊन पलायन केलं, अशी कमेंट या युजरने समंथाच्या पोस्टवर केली. ही कमेंट पाहिल्यावर अभिनेत्रीने त्याला प्रत्युत्तर दिलं आहे. तुमच्या आत्म्यास शांती लाभो, असं प्रत्युत्तर देत समंथाने या युजरची बोलती बंद केली आहे.
दरम्यान, २ ऑक्टोबर रोजी समंथाने नागा चैतन्यापासून विभक्त होत असल्याची घोषणा केली. तिच्या या घोषणनेनंतर चाहत्यांना जबर धक्का बसला होता. बराच काळ एकमेकांना डेट केल्यानंतर या दोघांनी २०१७ मध्ये लग्न केलं होतं. मात्र, अवघ्या काही वर्षातच ते विभक्त झाले.