Join us

Engaged! प्रसिद्ध गायक अरमान मलिकने गुपचूप उरकला साखरपुडा, फोटो सोशल मीडियावर व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Published: October 23, 2023 2:05 PM

अरमानने नुकताच गर्लफ्रेंड आशना श्रॉफबरोबर साखरपुडा उरकला आहे. त्याचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. 

आपल्या सुमधूर आवाजाने प्रेक्षकांचं मनोरंजन करणारा अरमान मलिक बॉलिवूडमधील लोकप्रिय गायक आहे. अरमानचे लाखो चाहते आहेत. आता अरमान मलिक त्याच्या आयुष्याची नवीन सुरुवात करण्यास सज्ज आहे. अरमानने नुकताच गर्लफ्रेंड आशना श्रॉफबरोबर साखरपुडा उरकला आहे. त्याचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. 

काही दिवसांपूर्वीच अरमानने गर्लफ्रेंडबरोबरचे फोटो पोस्ट करत प्रेमाची कबुली दिली होती. आशना श्रॉफला प्रपोज करतानाचे फोटो अरमानने शेअर केले होते. आता त्याने गर्लफ्रेंडबरोबर मित्रपरिवार आणि कुटुंबीयांच्या उपस्थितीत साखरपुडा उरकला आहे. अरमानने साखरपुड्यातील काही खास क्षणांची झलक इन्स्टाग्रामवरुन शेअर केली आहे. अरमान मलिकच्या कसम से गाण्यात आशना श्रॉफ झळकली होती. तेव्हापासूनच या दोघांच्या नात्याबाबत चर्चा सुरू होत्या. आता साखरपुड्यामुळे त्यांच्या नात्यावर शिक्कामोर्तब झालं आहे. 

साखरपुड्यासाठी अरमानने खास लूक केला होता. सफारी सूटमध्ये तो दिसून आला. तर आशनाने साडी नेसून ग्लॅमरस लूक केला होता. आशना श्रॉफ ही एक लोकप्रिय युट्यूबर आणि ब्लॉगर आहे. फॅशन आणि ब्यूटीसंबंधित व्हिडीओ ती बनवत असते. दरम्यान, आशना ही अरमानपेक्षा दोन वर्षांनी मोठी असल्याची माहिती आहे.  अरमान मलिक हा प्रसिद्ध संगीतकार सरदार मलिक यांचा नातू आणि गायक अनु मलिक यांचा पुतण्या आहे.'जहर','बोल दो न जरा','पहला प्यार','मुझको बरसात बना लो','मैं रहूँ या न रहूँ' अशी अनेक सुपरहिट गाणी अरमान मलिकने गायली आहेत.  

टॅग्स :अरमान मलिकसेलिब्रिटी