Join us

अत्यंत शुभ अन् अद्भुत अनुभव; लोकप्रिय गायक कैलाश खेर यांची कुंभमेळ्याला हजेरी, त्रिवेणी संगमावर केलं स्नान 

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 24, 2025 16:29 IST

प्रसिद्ध बॉलिवूड पार्श्वगायक कैलाश खेर (Kailash Kher) यांनी सुद्धा महाकुंभ मेळ्याला हजेरी लावल्याचं पाहायला मिळतंय.

Kailash Kher : भारतीय संस्कृतीमध्ये कुंभमेळ्याला अनन्यसाधारण महत्व आहे. कुंभमेळा हा जगातील सर्वात मोठा धार्मिक मेळा आहे. सध्या उत्तर प्रदेश येथील प्रयागराजमध्ये १३ जानेवारीपासून सुरु झालेला हा महाकुंभमेळा आता अंतिम टप्प्यात आहे. दरम्यान, या पवित्र कार्यक्रमात कोट्यवधी भाविकांसह, बॉलिवूड आणि टीव्ही जगतातील अनेक सेलिब्रिटींनी हजेरी लावली. जगाच्या कानाकोपऱ्यातून भाविक या कुंभमेळ्यामध्ये दाखल होत आहेत. अनुपम खेर, गायक गुरू रंधावा, शंकर महादेवन, रेमो डिसूझा तसेच अक्षय कुमार, विवेक ओबेरॉय यांच्यासह अनेकांनी महाकुंभ मेळ्यात हजेरी लावत त्रिवेणी संगमामध्ये स्नान केलं आहे. अशातच अलिकडेच प्रसिद्ध बॉलिवूड पार्श्वगायक कैलाश खेर (Kailash Kher) यांनी सुद्धा महाकुंभ मेळ्याला हजेरी लावल्याचं पाहायला मिळतंय.

सोशल मीडियावर कैलाश खेर यांनी  प्रयागराज येथील महाकुंभमेळ्यात स्नान केल्याचा व्हिडीओ शेअर केला आहे. "आई-वडील आणि गुरुवर्यांच्या आशीर्वाद तसेच महादेवाच्या कृपेमुळे आज महाकुंभमेळ्यामध्ये त्रिवेणी संगमावर स्नान करण्याचं हे माझं भाग्य आहे. हा एक अत्यंत शुभ आणि अद्भुत अनुभव राहिला. यासाठी मी कृतज्ञ आहे. हर हर महादेव, हर हर गंगे, हर हर यमुना मइया, हर हर सरस्वती मइया...!" अशी पोस्ट शेअर करत त्यांनी कुंभमेळ्यातील अनुभव शब्दांच्या माध्यमातून मांडला आहे. 

कैलाश खेर यांच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचं झालं तर त्यांनी 'सय्या', 'मेरे निशान', 'जय जयकारा' अशा अनेक सुपरहिट गाण्यांसाठी आपला आवाज दिला आहे. आपल्या आजवरच्या कारकिर्दीत कैलाश खेर यांनी हिंदी नव्हे  तर मराठी गाणीही गायली आहेत.बॉलिवूड इंडस्ट्रीत आजही त्यांचं नाव मोठ्या आदराने घेतलं जातं. 

टॅग्स :कैलाश खेरबॉलिवूडसेलिब्रिटीकुंभ मेळा