Join us

"आम्हाला डायरेक्ट नोटीस दिली जाते अन् यांना...",  रणवीर अलाहाबादिया प्रकरणी मिका सिंहची प्रतिक्रिया 

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 12, 2025 17:18 IST

'इंडियाज गॉट लॅटेंट' या यूट्यूब विश्वातील लोकप्रिय कार्यक्रमात केलेल्या आक्षेपार्ह टिप्पणीमुळे यूट्यूबर रणवीर अलाहाबादिया  हा वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे.

Mika Singh: 'इंडियाज गॉट लॅटेंट' या यूट्यूब विश्वातील लोकप्रिय कार्यक्रमात केलेल्या आक्षेपार्ह टिप्पणीमुळे यूट्यूबर रणवीर अलाहाबादिया  हा वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. त्याच्यावर गुन्हा देखील दाखल झाला आहे. रणवीर अलाहाबादिया याने केलेल्या या वाददग्रस्त वक्तव्यामुळे सर्वच स्तरातून तीव्र प्रतिक्रिया उमटल्या असून 'इंडियाज गॉट लॅटेंट'चे निर्माते तसेच रणवीर याच्याविरोधात पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली आहे. रणवीर अलाहाबादियाच्या या वक्तव्यानंतर अनेक सेलिब्रिटीहीसोशल मीडियावर व्यक्त झाले आहेत. तर आता प्रसिद्ध बॉलिवूड गायक मिका सिंगने (Mika Singh) संतप्त प्रतिक्रिया दिली आहे. 

रणवीर अलाहाबादियाने केलेल्या या वक्तव्याचा निषेध करत सोशल मीडियावर व्हिडीओ शेअर करत मिका सिंहने प्रतिक्रिया दिली आहे. त्यादरम्यान व्हिडीओमध्ये मिका सिंह म्हणाला, "नमस्कार मित्रांनो मी मिका सिंह...!, सध्या समय रैना आणि रणवीर अलाबादियाच्या वादग्रस्त वक्तव्यामुळे सर्वत्र बातम्या वाऱ्यासारख्या पसरत आहेत. मी सुद्धा तो एपिसोड पाहिला आहे. या शोमध्ये अनेक अपशब्द वापरले जात आहेत आणि काहीही बोललं जात आहेत. मला वाटतं या लोकांचेही खूप चाहते असावेत. मग हा शो ज्यांना आवडत असेल त्यांच्यासाठी असावा. या शोमध्ये एक मुलगीही होती. ती मुलगीही फार चुकीचं बोलते आहे."

पुढे मिका सिंग म्हणाला की, "पण, माझा राग या मुलांवर नाही. मी कधीही या पॉडकास्ट शोमध्ये जात नाही. या शोमध्ये काही नावाजलेले लोकही जातात, ज्यांची मोठी नावे आहेत. माहित नाही हे लोक या शोमध्ये का जातात? यासाठी त्यांना भरपूर पैसे दिले जातात का? त्यांना रोखण्यासाठी कोणीतरी आवश्यक आहे. या मुलांना त्यांची चूक सांगणारा कोणीतरी असायला हवा."

दिलजीत दोसांझचं उदाहरण देत म्हणाला 

"मला वाईट वाटतं की जेव्हा दिलजीत दोसांझचा शो असेल किंवा जेव्हा माझा शो असतो. तेव्हा खूप लोक पुढे येतात. त्यावेळी अशी गाणी गाऊ नका किंवा हे करू नका. सार्वजनिक कार्यक्रमांमध्ये असे करू नका. असं सांगितलं. मला त्यांना विचारायचं आहे की, तुम्हाला हे लोकं दिसत नाहीत का? जे अतिशय अश्लील पद्धतीचं वक्तव्य करत आहेत. हे तुमचं कर्तव्य आहे की तुम्ही त्यांना समजावून सांगितलं पाहिजे की त्यांनी असं करू नये. यांना वेळीच रोखलं पाहिजे. पण, कोणताही सेलिब्रिटी असेल किंवा गायक असेल तर तुम्ही त्या लोकांची अडवणूक करता. माझी विनंती आहे तुम्ही अशा लोकांना नोटीस पाठवा, गुन्हा दाखल करा." 

टॅग्स :मिका सिंगबॉलिवूडसेलिब्रिटीसोशल मीडिया