Join us

"मी पूर्णपणे बरी...", सोशल मीडियावरील आजारपणाच्या अफवांवर मोनाली ठाकूरने सोडलं मौन 

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 23, 2025 15:06 IST

प्रसिद्ध पार्श्वगायिका मोनाली ठाकूरने नुकतीच सोशल मीडियावर पोस्ट शेअर केली आहे.

Monali Thakur : प्रसिद्ध पार्श्वगायिका मोनाली ठाकूरने (Monali Thakur) आपल्या गोड आवाजाने चाहत्यांची मनं जिंकली. अनेक सुपरहिट गाणी गाऊन या गायिकेने प्रेक्षकांचं पूरेपूर मनोरंजन केलं आहे. दरम्यान, मोनाली ठाकूर संदर्भात एक चिंता वाढणारी माहिती समोर आली आहे. पश्चिम बंगाल येथील दिनहाटा महोत्सवामध्ये लाईव्ह कॉन्सर्ट दरम्यान तिची तब्येत बिघडल्याचं वृत्त समोर आलं होतं. त्यादरम्यान गायिकेला श्वास घेण्यास त्रास होत असल्याने तिला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आल्याची माहिती सर्वत्र वाऱ्यासारखी पसरली. यामुळे मोनाली ठाकूरचे चाहते देखील चिंतेत होते. अखेर या प्रकरणावर मोनाली ठाकूरने मौन सोडलं आहे.

आपल्या अधिकृत सोशल मीडिया अकाउंटवर मोनालीने पोस्ट शेअर करत म्हटलंय, "मला आशा आहे की तुम्ही सगळे ठीक आहात. मी ही पोस्ट लिहित तुम्हाला विनंती करते की, माझ्या आरोग्याविषयी कोणतीही चुकीची माहिती पसरवू नका. तुमच्या सगळ्याचं प्रेम आणि काळजी मी समजू शकते. पण मला हे स्पष्ट करायचे आहे की मला श्वसनासंबंधी कोणतीही त्रास होत नाही आणि मला कोणत्याही रुग्णालयात दाखल करण्यात आलेलं नाही." पुढे तिने लिहिलंय की, "गेले काही दिवस मला व्हायरल इन्फेक्शनमुळे अस्वस्थ वाटत होतं आणि त्यामुळे मायग्रेनचा थोडासा त्रास होतोय. त्यानंतर आता मी मुंबईला परतली आहे, उपचार घेत आहे, विश्रांती घेत आहे. आता मी पूर्णपणे बरी आहे. ही गोष्ट आहे त्यापेक्षा मोठी करू नका, त्यापेक्षा कोणत्याही महत्त्वाच्या गोष्टींवर लक्ष केंद्रित करणं गरजेचं आहे. तुमचं प्रेम आणि सहकार्यासाठी मी आभारी आहे." अशा पोस्ट शेअर करत मोनालीने अफवाचं खंडण केलं आहे. 

मोनाली ठाकूरबद्दल सांगायचं झालं तर तिने ‘सवार लूं’, ‘जरा जरा टच मी’, ‘मोह मोह के धागे’,‘बद्री की दुल्हनिया’ अशी अनेक हिट गाणी तिने गायली आहेत. तसेच ‘दम लगाके हैशा’ या चित्रपटातील ‘मोह मोह के धागे’ हे गाणं लोकप्रिय ठरलं. या गाण्यासाठी मोनाली राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार देखील मिळाला आहे.

टॅग्स :बॉलिवूडसेलिब्रिटीसंगीतसोशल मीडिया