Join us

'दिल दियां गल्लां' फेम गायिका नेहा भसीनचं अनेकदा झालंय लैंगिक शोषण, मुलाखतीत केला खुलासा...

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 21, 2020 13:28 IST

एका मुलाखतीत तिने तिच्या पर्सनल लाइफबाबत सांगितलं आहे. तिने सांगितलं की, जेव्हा ती १० वर्षांची होती तेव्हा हरिद्वारमध्ये एका अनोळखी व्यक्तीने तिची छेड काढली होती. 

'सुल्तान' सिनेमातील 'जग घूमया', 'टायगर जिंदा है'मध्ये 'दिल दियां गल्लां' आणि 'भारत' मध्ये 'चासनी' सारखी गाणी गाणारी गायिका नेहा भसीनने खुलासा केला आहे की, तिचं आतापर्यंत अनेकदा लैंगिक शोषण झालं आहे. एका मुलाखतीत तिने तिच्या पर्सनल लाइफबाबत सांगितलं आहे. तिने सांगितलं की, जेव्हा ती १० वर्षांची होती तेव्हा हरिद्वारमध्ये एका अनोळखी व्यक्तीने तिची छेड काढली होती. 

न्यूज एजन्सी आयएएनएससोबत बोलताना ३७ वर्षीय नेहा म्हणाली की, त्यावेळी मी १० वर्षांची होते. देशातील धार्मिक स्थळांपैकी एक हरिद्वारमध्ये माझी आई माझ्यापासून काही अंतरावर उभी होती. अचानक एक व्यक्ती आली आणि माझ्या मागून चुकीच्या पद्धतीने त्याने स्पर्श केला. मी हैराण झाले आणि तेथून दूर पळाले'.

एका हॉलमध्येही झालं गैरवर्तन

नेहाने पुढे सांगितले की, काही वर्षांआधी एका व्यक्तीने एका हॉलमध्ये माझ्या छातीवर चुकीच्या पद्धतीने हात लावला. मला हे स्पष्टपणे आठवतं. मला वाटत होतं की, माझी चूक आहे. आता लोक सोशल मीडियावर  येतात आणि दुसऱ्यांना मानसिक, शारीरिक, भावनात्मक रूपाने प्रताडित करणं सुरू करतात. मी याला विना चेहऱ्याचा आतंकवाद मानते'.

मिळाली होती रेपची धमकी

नेहाने सायबर बुलिंगची आठवण काढत सांगितले की, तिला एकदा के-पॉप बॅन्डच्या प्रशंसकांनी रेप करण्याची आणि जीवे मारण्याची धमकी दिली होती. हे तेव्हा घडलं जेव्हा मी एका दुसऱ्या गायकाच्या विचाराचं समर्थन केलं होतं. मी के-पॉप बॅंडबाबत काहीच कमेंट केली नव्हती. केवळ इतकंच म्हणाले होते की, मी या पर्टिकुलर बॅंडची प्रशंसक नाही. त्यानंतर मला ट्रोल करण्यात आलं. माझा रेप करण्याची आणि मला जीवे मारण्याची धमकीही देण्यात आली होती. मी हे सगळं पाहिलं आहे. मी आता गप्प बसत नसते. पोलिसात तक्रार करते. 

टॅग्स :नेहा भसीनलैंगिक छळबॉलिवूड