Join us  

प्रसिद्ध गायिका तुलसी कुमारचा अपघात; शूटिंगदरम्यान सेट अंगावर कोसळला अन्, VIDEO व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Published: October 08, 2024 1:53 PM

लोकप्रिय गायिका तुलसी कुमारचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर समोर आला आहे.

Tulsi kumar : लोकप्रिय गायिका तुलसी कुमारचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर समोर आला आहे.  एका म्यूझिक व्हिडीओच्या शूटिंगदरम्यान तिच्यासोबत ही घटना घडली आहे. गायिका सेटवर शूट करत असताना कॅमऱ्यासमोर उभी होती. त्यावेळी गायिकेच्या अंगावर शेड पडत असताना ती त्यातून बचावते. पण, यामुळे तिला दुखापत झाल्याचं कळतंय. या घडलेल्या घटनेचा व्हिडीओ कॅमेऱ्यात कैद करण्यात आला आहे. 

नुकताच सोशल मीडियाच्या माध्यमातून प्रसिद्ध बॉलिवूड सिंगर तुलसी कुमारचाअपघात घडल्याची घटना समोर आली आहे. 'इंस्टट बॉलिवूड' या इन्स्टाग्राम अकाउंटवरून हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आल्याचं पाहायला मिळतंय. 

व्हायरल व्हिडीओनुसार, गायिका कॅमेऱ्यासमोर शूट करण्यासाठी येते आणि अचानक तिच्यावर पाठीमागे असलेला शेड कोसळतो. घटनास्थळी असलेला एक माणूस क्षणाचाही विलंब न करतो तो खाली पडणारा  शेड एका हातात पकडतो. शिवाय, गायिका देखील तत्परता दाखवून तिथून बाजूला होते. त्यामुळे मोठा अनर्थ टळला आहे. एकंदरीत व्हिडीओ पाहून तिच्या पाठीला दुखापत झाल्याचं कळतंय. 

चाहत्यांच्या चिंतेत वाढ-

सोशल मीडियावर व्हायरल होणारा व्हिडीओ पाहून तुलसीचे चाहत्यांची चिंता वाढली आहे. शिवाय नेटकऱ्यांनी तेथील कार्यपद्धतीवर देखील कमेंट्च्या माध्यमातून प्रश्न उपस्थित केले आहेत. 

टॅग्स :तुलसी कुमारबॉलिवूडसेलिब्रिटीअपघात