जगात मोजक्याच लोकांकडे असलेली सर्वात महागडी कार अजय देवगनकडे, किंमत वाचून व्हाल अवाक्...
By ऑनलाइन लोकमत | Published: July 27, 2020 10:49 AM2020-07-27T10:49:50+5:302020-07-27T11:26:29+5:30
अजयकडे मर्सिडीज बेंज डब्ल्यू ११५ २२०डी, मिनी कूपर, बीएडब्ल्यू जेड ४, रेंज वोग सारख्या महागड्या कार आहेत. पण यात सर्वात खास गाडी आहे एसयूव्ही रॉल्स रॉयस क्लीनिन.
बॉलिवूड अभिनेता अजय देवगन हा सिनेमात जेवढ्या एकापेक्षा एक महागड्या आणि लक्झरी कार्स वापरतो तशाच कार तो खऱ्या आयुष्यात वापरतो. अजयच्या कलेक्शनमध्ये एकापेक्षा एक भारी गाड्या आहेत. पण यात एक कार सर्वात खास आहे. अजयकडे मर्सिडीज बेंज डब्ल्यू ११५ २२०डी, मिनी कूपर, बीएडब्ल्यू जेड ४, रेंज वोग सारख्या महागड्या कार आहेत. पण यात सर्वात खास गाडी आहे एसयूव्ही रॉल्स रॉयस क्लीनिन.
अजयने काही महिन्यांपूर्वीच जगातील सर्वात महागडी आणि लक्झरी एसयूव्ही रॉल्स रॉयस क्लीनिन कार विकत घेतली आहे. ही कार खूपआधी आडॅर केली होती, मात्र कस्टमाइज करण्यासाठी बराच वेळ लागला. आता ही कार त्याच्या लक्झरी कारच्या कलेक्शनमध्ये सामिल झाली आहे.
या कारबाबत सांगायचं तर रोल्स रॉयस क्लीनिन ही जगातील सर्वात महागड्या एसयूव्हींपैकी एक आहे. या कारच्या सुरवातीच्या मॉडलची किंमत ६.९५ कोटी रूपयांपासून सुरू होते. त्यात अजयने ही कार कस्टमाइज केल्याने त्याची किंमत आणखीणच वाढते. ही कार भारतातील काही मोजक्याच लोकांकडे आहे. ज्यामध्ये देशाचे सर्वात मोठे उद्योगपती मुकेश अंबानीचे नाव देखील सामील आहे. याशिवाय टी-सीरीज़चे मालक भूषण कुमार यांनीही लाल रंगाची एसयूव्ही बुक केली होती.
एसयूव्ही रोल्स रॉय क्लिनिनमध्ये ६.८ लीटरचे ट्विन चार्जर व्ही १२ पेट्रोल इंजिन आहे. जे ५६० बीएचपी आणि ८५० एनएम टॉर्क देते. कारच्या आत ८-स्पीड ऑटोमॅटिक गिअरबॉक्स आहे. कार फक्त ० ते १०० किमी पर्यंत अंतर ५ सेकंदात कापू शकते. कारची टॉप स्पीड २४९ किलोमीटर प्रति तास आहे. कारमध्ये सस्पेंशन सोबत ३६० डिग्री कॅमेरा सिस्टम देखील आहे.