Join us  

किस्सा : हेमा मालिनीसोबत दुसरं लग्न केल्यावर धर्मेंद्र यांच्या पहिल्या पत्नीची रिअ‍ॅक्शन काय होती?

By ऑनलाइन लोकमत | Published: March 09, 2022 11:55 AM

Dharmendra and Hema Mailini : धर्मेंद्र आणि हेमा यांनी एकत्र काम केलं आणि एकमेकांच्या प्रेमात पडले. पण तेव्हा धर्मेंद्र यांचं आधीच लग्न झालेलं होतं आणि मुलंही होते. त्यांची पत्नी होती प्रकाश कौर.

धर्मेंद्र (Dharmendra) आणि हेमा मालिनी (Hema Malini) ही जोडी बॉलिवूडच्या सर्वात फेमस जोड्यांपैकी एक आहे. धर्मेंद्र यांनी एक काळ गाजवला. ते 'ही मॅन' म्हणून ओळखले जात होते. त्यावेळच्या सर्वच अभिनेत्रींना धर्मेंद्र यांच्यासोबत काम करायचं होतं. तेच बॉलिवूडची ड्रीमगर्ल हेमा मालिनीसोबतही सर्वांना काम करायचं होतं. धर्मेंद्र आणि हेमा यांनी एकत्र काम केलं आणि एकमेकांच्या प्रेमात पडले. पण तेव्हा धर्मेंद्र यांचं आधीच लग्न झालेलं होतं आणि मुलंही होते. त्यांची पत्नी होती प्रकाश कौर (Prakash Kaur).

हेमा मालिनी विवाहित धर्मेंद्रसोबत लग्न करण्यास तयार नव्हती. हेमा आणि धर्मेंद्र यांच्या प्रेमाबाबत जेव्हा प्रकाश कौर यांना समजलं तेव्हा त्यांना चांगलाच धक्का बसला होता. याबाबत मीडियासोबत बोलताना प्रकाश कौर म्हणाल्या होत्या की, 'धर्मेंद्र भलेही एक चांगले पती ठरू शकले नाहीत, पण ते एक चांगले वडील आहेत आणि नेहमीच आपल्या मुलांवर प्रेम करतात व त्यांना त्यांनी वेळ दिला'. तसेच त्या म्हणाल्या होत्या की, जर मी हेमाच्या जागी असते तर असं कधीच केलं नसतं.

धर्मेंद्र यांच्या चारित्र्यावर प्रश्न उपस्थित केले गेल्यावर प्रकाश कौर संतापल्या होत्या. त्या म्हणाल्या होत्या की 'कुणालाही हेमासोबत लग्न करण्याची इच्छा झाली असती. फक्त माझ्या पतीला दोष देणं योग्य नाही. इंडस्ट्रीत असे अनेक असे विवाहित हिरो आहेत ज्यांनी दुसरं लग्न केलं नाही. त्यामुळे केवळ माझ्या पतीवर आरोप लावणं योग्य नाही'.

जेव्हा १९५४ मध्ये धर्मेंद्र आणि प्रकाश कौर यांचं लग्न झालं होतं तेव्हा त्या केवळ १९ वर्षांच्या होत्या. त्यांना चार मुलं सनी देओल, बॉबी देओल, विजयता आणि अजीता होते. धर्मेंद्र यांचं त्यांच्या मुलांवर खूप प्रेम होतं. ते आताही मुलांचे बालपणीचे फोटो शेअर करत असतात. 

धर्मेंद्र आणि हेमा मालिनी यांनी १९८० मध्ये लग्न केलं. त्यांना दोन मुली ईशा देओल आणि आहना देओल आहेत. धर्मेंद्र यांनी प्रकाश कौर यांना घटस्फोट न देताच हेमा मालिनीसोबत लग्न केलं होतं. यासाठी त्यांनी मुस्लीम धर्म स्वीकारला होता. त्यावेळी अभिनेते संजीव कुमार यांनी हेमा मालिनीला लग्नासाठी विचारलं होतं. पण तिने नकार दिला होता. 

टॅग्स :धमेंद्रहेमा मालिनी