Mahesh Babu Controversy :साऊथ सुपरस्टार महेश बाबू (Mahesh Babu) सध्या एका वक्तव्यामुळे चर्चेत आहे. बॉलिवूड मुझे अफोर्ड नहीं कर सकता, असं महेश बाबू बोलला आणि त्याच्या या वक्तव्यानं अप्रत्यक्षपणे बॉलिवूड विरूद्ध साऊथ सिनेमा असा रंग घेतला. या वादाच्या निमित्ताने दोन्ही बाजूंनी प्रतिक्रिया उमटत आहेत. नुकतीच सुनील शेट्टी आणि मुकेश भट यांनी या वादात उडी घेतली. बाप बाप असतो, अशा शब्दांत सुनील शेट्टीनं महेश बाबूला फटकारलं. मुकेश भट यांनी अप्रत्यक्षपणे महेश बाबूचं समर्थन केलं. आता या वादावर निर्माता-दिग्दर्शक राम गोपाल वर्मा (Ram Gopal Varma) यांनी सुद्धा प्रतिक्रिया दिली आहे.‘इंडिया टुडे’ला दिलेल्या मुलाखतीत राम गोपाल वर्मा यावर बोलले. बॉलिवूड मुझे अफोर्ड नहीं कर सकता, या महेश बाबूच्या वक्तव्यावर त्यांनी प्रतिक्रिया दिली.
काय म्हणाले, राम गोपाल वर्मामहेश बाबू जे काही बोलला ती त्याची आवड आहे. पण प्रामाणिकपणे सांगायचं तर, बॉलिवूड मुझे अफोर्ड नहीं कर सकता है, असं महेश बाबू का म्हणाला हे मला कळलेलं नाही. त्याच्या म्हणण्याचा अर्थ मला तरी कळलेला नाही. अलीकडचे साऊथचे सिनेमे पाहिले तर ते हिंदीत डब करून रिलीज केले जातात आणि त्यातून हे लोक पैसे कमावतात. माझ्या मते, बॉलिवूड काही कुठली कंपली नाही. हे मीडियाने दिलेलं एक नाव आहे. एखादी विशिष्ट फिल्म कंपनी वा प्रॉडक्शन हाऊस तुम्हाला एका विशिष्ट रकमेवर फिल्म ऑफर करतो. मग तुम्ही संपूर्ण बॉलिवूडचं नाव कसं घेऊ शकता? मला तर हे कळलेलं नाही. बॉलिवूड कुठली कंपनी नाही, त्यामुळे महेश बाबूच्या म्हणण्याचा अर्थच अस्पष्ट आहे, असं रामगोपाल वर्मा म्हणाले.
काय म्हणाला महेशबाबू...बॉलिवूडमध्ये डेब्यू करण्याचा विचार आहे का? असा सवाल महेश बाबूला या इव्हेंटमध्ये विचारण्यात आला. यावर महेशबाबूनं दिलेलं उत्तर ऐकून सगळेच हैराण झालेत. ‘बॉलिवूडमधून मला अनेक ऑफर्स मिळतात. पण मला वाटतं,बॉलिवूड मला अफोर्ड करू शकणार नाही. त्यांना मी परवडणार नाही. त्यामुळे मी तिथे जाऊन माझा वेळ वाया घालवू इच्छित नाही,’असं महेश बाबू म्हणाला. ‘मला साऊथच्या सिनेमांनी जेवढं काही स्टारडम, यश, प्रेम दिलं आहे, ते भरपूर आहे. मला आणखी स्टारडम नकोय. माझी इंडस्ट्री सोडून दुसरीकडे काम करण्याची माझा विचार नाही. मी नेहमी मोठं व्हायचं आणि भरपूर सिनेमा बनवायचं स्वप्न पाहिलं होतं. माझं स्वप्न आता खरं होत आहे. मी इथेच खूश आहे. मला नेहमीच तेलगू चित्रपटात काम करायचं होतं. भारतातील सर्व लोकांनी ते पाहावेत अशी इच्छा होती.आता असं होतांना दिसतंय आणि याचा मला आनंद आहे. माझी ताकद तेलगू सिनेमे आहेत,’असंही तो म्हणाला.