बॉलिवूडचे बॅड बॉइज!!
By ऑनलाइन लोकमत | Published: April 06, 2018 9:10 AM
काळवीट शिकार प्रकरणी जोधपूर जिल्हा व सत्र न्यायालयाने पाच वर्षांची शिक्षा सुनावलेल्या सुपरस्टार सलमान खानची तुरुंगात रवानगी करण्यात आली. ...
काळवीट शिकार प्रकरणी जोधपूर जिल्हा व सत्र न्यायालयाने पाच वर्षांची शिक्षा सुनावलेल्या सुपरस्टार सलमान खानची तुरुंगात रवानगी करण्यात आली. परंतु तरुंगाची वारी करणारा सलमान एकमेव अभिनेता नसून, यापूर्वीही अनेक बॉलिवूड स्टार्सला तुरुंगाची हवा खावी लागली आहे. काही तर अजूनही सलमानप्रमाणे न्यायालयाच्या पायºया झिजवत आहेत. अशाच बॉलिवूडमधील ‘बॅड बॉइज’चा आढावा घेणारा हा वृत्तांत... संजय दत्तसलमानचा जीवलग मित्र असलेल्या अभिनेता संजय दत्त काही महिन्यांपूर्वीच शिक्षा पूर्ण करून बाहेर आला आहे. १९९३ मध्ये मुंबईत झालेल्या सीरियल बॉम्बस्फोटादरम्यान अवैधरीत्या शस्त्रास्त्रे बाळगल्याप्रकरणी संजय दत्तला दोषी ठरविण्यात आले होते. २०१३ मध्ये त्याला टाडा कायद्याअंतर्गत पाच वर्षांची शिक्षा सुनाविण्यात आली होती. त्यानंतर त्याची येरवडा कारागृहात रवानगी करण्यात आली होती. २०१६ मध्ये शिक्षा भोगून तो बाहेर पडला. फरदीन खानअभिनेता फरदीन खानला २००१ मध्ये त्याच्या ‘प्यार तुने क्या किया’ या चित्रपटाच्या प्रदर्शनानंतर अटक करण्यात आली होती. कोकीन बाळगल्याप्रकरणी त्याला ही अटक करण्यात आली होती. यासाठी त्याला काही दिवस तुरूंगाची हवा खावी लागली होती. सध्या फरदीन इंडस्ट्रीमधून गायब असून, त्याच्या कमबॅकची चाहत्यांना आतुरता आहे. सैफ अली खानसलमान खानच्या चांगल्या मित्रांपैकी एक असलेल्या सैफ अली खानलाही न्यायालयाच्या वाºया कराव्या लागल्या. कारण सैफदेखील सलमानसोबत काळवीट शिकार प्रकरणामध्ये अडकलेला होता. नुकताच तो या प्रकरणाच्या सुनावणीसाठी जोधपूर येथे पोहोचला होता. या प्रकरणातून न्यायालयाने त्याची निर्दोष मुक्तता केली. एवढेच नव्हे तर सैफवर २००४ साली हवाल्याच्या माध्यमातून महागडी कार खरेदी केल्याचा आरोप करण्यात आला होता. शाइनी आहुजाआपल्या मोलकरीणीवर बलात्कार केल्याप्रकरणी अभिनेता शाइनी आहुजाचीही कारागृहात रवानगी करण्यात आली होती. न्यायालयाने त्याला या प्रकरणात सात वर्षांची शिक्षा सुनावली होती. शिक्षा सुनावल्यानंतर न्यायालयातच शाइनीला रडू कोसळले होते. पुढे पीडितेने तिचे आरोप मागे घेतले. मात्र या प्रकरणामुळे शाइनीचे करिअरच संपून गेले. जॉन अब्राहम बॉलिवूडमध्ये दमदार इमेजसाठी ओळखल्या जाणारा अभिनेता जॉन अब्राहमलाही तरुंगाची हवा खावी लागली. त्याने दोन लोकांना दुचाकीने धडक देऊन गंभीररीत्या जखमी केले होते. याप्रकरणी जेव्हा त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला तेव्हा त्याने त्याचा गुन्हा कबूल केला. यासाठी त्याला १५ दिवसांची शिक्षा ठोठावण्यात आली होती. सूरज पंचोलीअभिनेत्री जिया खान आत्महत्या प्रकरणी अभिनेता सूरज पंचोलीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जियाने मृत्यूअगोदर सूरज पंचोलीच्या नावाने एक पत्र लिहिले होते. पोलिसांना हे पत्र प्राप्त झाल्यानंतर आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी सूरजवर गुन्हा दाखल केला होता. पुढे १० जून २०१३ रोजी त्याला अटकही करण्यात आली. दरम्यान, सध्या न्यायालयाकडून सूरजला याप्रकरणी दिलासा मिळाला आहे.