कोरोना व्हायरसचे संक्रमण दिवसेंदिवस वाढतच चालले आहे. बॉलिवूड आणि मराठी सिनेइंडस्ट्रीतील अनेक सेलिब्रिटी देखील या कोरोनाच्या विळख्यात अडकले आहेत. आलिया भट्ट, कार्तिक आर्यन, मनोज वाजपेयी, आमिर खान,आर. माधवन, गोविंदा आणि अक्षय कुमार यांच्यानंतर आता अभिनेत्री भूमी पेडणेकर हिलादेखील कोरोनाची लागण झाली आहे. तिने सोशल मीडियावर ती कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे सांगितले आहे.
भूमी पेडणेकरने सोशल मीडिया इंस्टाग्रामवर तिला कोरोनाची लागण झाल्याचे सांगत म्हटले की, मला आज कोरोनाचे सौम्य लक्षण असल्याचे समजले आहे. पण मी बरी आहे आणि स्वतःला क्वारंटाइन केले आहे. मी माझे डॉक्टर आणि हेल्थ प्रोफेशनल्सच्या सूचनांचे पालन करते आहे.
बॉलिवूड कोरोनाच्या विळख्यातगेल्या काही दिवसांपासून बॉलिवूडमधील बऱ्याच कलाकारांना कोरोनाची लागण झाली आहे. ज्यात रणबीर कपूर, आर. माधवन, मनोज वाजपेयी, आमिर खान, आलिया भट, फातिमा सना शेख, गोविंदा या कलाकारांचा समावेश आहे.
राम सेतूच्या सेटवर कोरोनाचा विस्फोटबॉलिवूड अभिनेता अक्षय कुमारची कोरोना चाचणी पॉझिटीव्ह आल्यानंतर सध्या शुटिंग सुरू असलेल्या त्याच्या 'राम सेतू' चित्रपटातील सेटवरील तब्बल ४५ जणांना कोरोनाची लागण झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. चित्रपटाच्या सेटवर इतक्या मोठ्या प्रमाणात कोरोनाचा विस्फोट झाल्यामुळे चित्रीकरण थांबविण्यात आले आहे.