गेल्या काही दिवसांपासून बॉलिवूडमधील बऱ्याच कलाकारांना कोरोनाची लागण झाली आहे. ज्यात रणबीर कपूर, आर. माधवन, मनोज वाजपेयी, आमिर खान, आलिया भटपासून दंगल फेम फातिमा सना शेख या कलाकारांचा समावेश आहे. फातिमा सना शेखने मागील काही दिवसांपूर्वी कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे सांगितले होते आणि आता तिने कोरोनामुळे तिचे हाल होत असल्याचाही खुलासा केला आहे. फातिमा सना शेखने एक पोस्ट शेअर केली आहे. ज्यात तिने आपल्या तब्येतीबद्दल सांगितले आहे.
फातिमा सना शेखने इंस्टाग्राम स्टोरीवर स्वतःचा एक फोटो शेअर केला आहे. ज्यात ती खूप आजारी दिसते आहे. या फोटोत ती उदास दिसते आहे. तिने स्वतःचा सेल्फी क्लिक केला आहे. फोटो शेअर करत तिने लिहिले की, कोरोनामुळे तिला अडचणींचा सामना करावा लागतो आहे. फातिमाने म्हटले की, वास घेण्याची आणि चवीची क्षमता संपली आहे आणि शरीर खूप दुखते आहे. तिच्या या पोस्टवरून लक्षात येते की सध्या ती वाईट टप्प्यातून जात आहे.