बॉलिवूड चित्रपटांमध्ये रोमांस नसेल तर चित्रपट अपूर्ण वाटतो. हल्लीच्या चित्रपटात खूप बोल्ड सीन असतो. मात्र तुम्हाला माहित आहे का, बॉलिवूडमध्ये पहिला किसिंग सीन पहिल्यांदा कधी चित्रीत झाला होता. ८४ वर्षांपूर्वी बॉलिवूडमध्ये चित्रपट कर्मामध्ये किसिंग सीन चित्रीत करण्यात आला होता.
आता किसिंग सीन म्हटलं की डोळ्यासमोर येतो तो बॉलिवूड अभिनेता इमरान हाश्मी. मात्र किसिंग सीनची सुरूवात अभिनेत्री देविका राणीने केली होती. १९३३ साली प्रदर्शित झालेला चित्रपट कर्मामध्ये अभिनेत्री देविका राणी व हिमांशु राय यांनी पहिला किसिंग सीन दिला होता. चार मिनिटांचा हा किसिंग सीन होता. पण, हा कोणत्या लव सीनचा भाग नव्हता. तर या सीनमध्ये अभिनेता बेशुद्ध होतो आणि त्याला शुद्धीत आणण्यासाठी ती त्याला किस करते.