बॉलिवूडचा ‘फ्रेश ट्रेंड’ : हिरोपेक्षा ‘मोठी’ हिरोईन!!
By ऑनलाइन लोकमत | Published: August 30, 2016 4:15 PM
पन्नाशी ओलांडलेल्या सलमानने गतवर्षी ३० वर्षांच्या सोनम कपूरशी ‘प्रेम रतन धन पायो’मध्ये स्क्रीन शेअर केली. यानंतर तो ‘सुल्तान’मध्ये २७ ...
पन्नाशी ओलांडलेल्या सलमानने गतवर्षी ३० वर्षांच्या सोनम कपूरशी ‘प्रेम रतन धन पायो’मध्ये स्क्रीन शेअर केली. यानंतर तो ‘सुल्तान’मध्ये २७ वर्षांच्या अनुष्का शर्मासोबत दिसला. शाहरूख खान यानेही पन्नाशी ओलांडली. पण चेहºयावरील सुरकुत्या लपवत अधिक तरूण दिसण्याच्या लालसेने स्वत:पेक्षा कमी वयाच्या हिरोईनसोबत रोमान्स करताना तो सुद्धा जराही कचरला नाही. पण हेच हिरोईनबाबत म्हणाल तर काही वर्षांपूर्वीपर्यंत तशी कल्पनाही बॉलिवूडमध्ये करवत नव्हती. अगदी लग्न झाले रे झाले की अभिनेत्रींच्या करिअरला ओहोटी लागायची. पण आताश: ट्रेंड बदललाय. नायिका प्रधान चित्रपट प्रेक्षकांनी जितक्या सहजपणे स्वीकारले, अगदी तितक्याच सहजपणे वयाने मोठ्या असलेल्या अभिनेत्रींचा यंग हिरोंसोबतचा रोमान्सही प्रेक्षक स्वीकारू लागले आहेत. लवकरच येऊ घातलेला ‘बार बार देखो’, ‘ऐ दिल है मुश्किल’ हे चित्रपट असोत किंवा अगदी अलीकडे येऊन गेलेला ‘की अॅण्ड का’ असो, हे व असे अनेक चित्रपट या बदलत्या ट्रेंडची आदर्श उदाहरणे आहेत. याच ‘फ्रेश ट्रेंड’वर टाकलेला हा दृष्टिक्षेप...कॅटरिना कैफ ‘बार बार देखो’ या आगामी चित्रपटात ३३ वर्षांची कॅटरिना कैफ ३१ वर्षांच्या सिद्धार्थ मल्होत्रासोबत रोमान्स करताना दिसणार आहे. कॅटरिना आत्तापर्यंत खान, कपूर यांच्यासोबतच रोमान्स करताना दिसली. पण अलीकडे कॅटरिना तिच्यापेक्षा ‘यंग’ हिरोंसोबत दिसू लागली आहे. ‘बार बार देखो’ या चित्रपटाआधी कॅटरिना ‘फितूर’मध्ये आदित्य राय कपूरसोबत दिसली होती. आदित्यही कॅटरिनापेक्षा लहान. पण कॅटरिनाने ‘ओल्डर हिरोईन विद यंग हिरो’ या समीकरणाशी चांगलेच जुळवून घेतले.ऐश्वर्या रॉय : मोठी हिरोईन आणि लहान हिरो हेच समीकरण करण जोहरच्या ‘ऐ दिल है मुश्किल’ या चित्रपटातही दिसणार आहे. ४२ वर्षांची, एका मुलीची आई असलेली ऐश्वर्या रॉय बच्चन तिच्यापेक्षा पुरत्या दहा वर्षांने लहान असलेल्या रणबीर कपूरशी आॅनस्क्रीन रोमान्स करताना या चित्रपटात दिसणार आहे. या दोघांमधील ‘इन्टेन्स केमिस्ट्री’ यात दिसणार असल्याची ‘हॉट’ चर्चा सध्या बॉलिवूडमध्ये रंगली आहे. यापूर्वीही ‘गुरू’, ‘रावण’ आणि ‘उमराव जान’ या चित्रपटात ऐश्वर्या तिच्यापेक्षा दोन वर्षांने लहान असलेल्या अभिषेक बच्चनशी (ऐश्वर्याचा रिअल लाईफ पती) रोमान्स करताना दिसली होती. करिना कपूर : ‘की अॅण्ड का’ या अलीकडे येऊन गेलेल्या चित्रपटात करिना कपूर आणि अर्जून कपूर ही जोडी दिसली. पस्तीशीची करिना आणि तिशीतला अर्जून या चित्रपटात दिसले. पण पडद्यावर करिना आणि अर्जून यांच्यातील वयाचा फरक आडवा आला नाही. याऊलट त्यांच्या दोघांमधील ‘केमिस्ट्री’चीच अधिक चर्चा झाली. ‘एक मै और, एक तू’ आणि ‘गोरी तेरे प्यार में’ या दोन चित्रपटातही करिना तिच्यापेक्षा ‘यंग’ असलेल्या इमरान खानसोबत रोमान्स करताना दिसली.प्रियांका चोप्रा : ‘गुंडे’ या चित्रपटात तिशीत असलेल्या प्रियांका चोप्रा हिने पंचविशी ओलांडलेल्या रणवीर कपूर आणि अर्जून कपूर या दोघांसोबत स्क्रीन शेअर करण्याचा प्रॅक्टिकल निर्णय घेतला. स्वत:पेक्षा यंग हिरोशी स्क्रीन शेअर करताना ती अगदी सहज दिसली.विद्या बालन : विद्या बालन तिच्यापेक्षा सुमारे चार वर्षांने लहान शाहीद कपूरसोबत ‘किस्मत कनेक्शन’मध्ये रोमान्स करताना दिसली. पण चॉकलेट बॉय शाहीद व विद्याची जोडी पडद्यावर तितकीच विजोड दिसली. पण यानंतरही एक वर्षांने लहान इमरान हाश्मीसोबत ‘सिल्क स्मिता’मध्ये रोमान्स करण्याची रिस्क विद्याने उचलली.कोंकणा सेन : कोंकणा सेन ही सुद्धा तिच्यापेक्षा चार वर्षे लहान रणबीर कपूरसोबत ‘वेक अप सिड’ या चित्रपटात स्क्रीन शेअर करताना दिसली. अर्थात ही जोडी चित्रपटाच्या कथानकाच्या चौकटीत अगदी फिट बसली.