बॉलिवूडच्या कलाकारांचेदेखील अंडरवर्ल्डसोबत नातेसंबंध राहिलेले आहेत. इतकंच नाही तर काही अभिनेत्रींना आपले करियर पणाला लावत अंडरवर्ल्डच्या डॉनच्या प्रेमातदेखील पडल्या होत्या. अभिनेत्री मंदाकिनी आणि दाउद यांच्या अफेअरची एकेकाळी खूप चर्चा झाली होती. मात्र मंदाकिनीनंतर दुसरी अभिनेत्री दाउदच्या आयुष्यात आल्यानंतर त्यांच्या नात्याला पूर्णविराम लागल्याचे बोलले जाते. अभिनेत्री मंदाकिनीने वयाच्या 16 व्या वर्षी बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. मंदाकिनीचे खरे नाव आहे यास्मिन जोसेफ. या यास्मिनला खरी ओळख मिळाली ती राज कपूर यांच्या ‘राम तेरी गंगा मैली’ या सिनेमाने. या चित्रपटातील तिने दिलेल्या बोल्ड सीनची आजही चर्चा होते. पहिला चित्रपट सुपरहिट ठरल्यामुळे मंदाकिनीला बॉलिवूडमधून मोठ्या दिग्दर्शकांकडून चित्रपटासाठी ऑफर येऊ लागल्या. त्यानंतर तिने भरपूर चित्रपटांमध्ये काम केले. पण तिचा दुसरा चित्रपट एवढा हिट नव्हता जेवढा तिचा पहिला चित्रपट सुपरहिट होता तरी देखील प्रेक्षकांनी तिला भरपूर प्रतिसाद दिला.