Join us

बोमन इराणी दिग्दर्शित पहिला सिनेमा 'द मेहता बॉईज'चा ट्रेलर रिलीज, बाप-लेकाच्या हळव्या नात्याची कहाणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 29, 2025 13:38 IST

बोमन इराणी या सिनेमाच्या माध्यमातून दिग्दर्शनात पदार्पण करत आहेत (boman irani, the mehta boys)

'मुन्नाभाई एमबीबीएस', 'लगे रहो मुन्नाभाई', 'खोसला का घोसला', '३ इडियट्स' अशा सिनेमांमधून भूमिका साकारणारे चतुरस्त्र अभिनेते म्हणजे बोमन इराणी. बोमन यांनी अभिनेता म्हणून अनेक सिनेमे गाजवले आहेत. आता बोमन पहिल्यांदाच दिग्दर्शनाची धुरा सांभाळणार आहेत. बोमन इराणी दिग्दर्शित पहिल्या सिनेमाचा ट्रेलर सोशल मीडियावर रिलीज करण्यात आलाय. 'द मेहता बॉईज' असं या सिनेमाचं नाव आहे. बाप-लेकाच्या नात्याची हळवी कहाणी सिनेमात दिसतेय.

'द मेहता बॉईज' सिनेमाचा ट्रेलर

बोमन इराणी दिग्दर्शित 'द मेहता बॉईज' सिनेमाच्या ट्रेलरमध्ये दिसतं बाप आणि मुलामध्ये वारंवार खटके उडताना दिसतात. छोट्या छोट्या गोष्टींवरुन बोमन इराणी आणि त्यांच्या मुलामध्ये मतभेद होताना दिसतात. दोघांचीही मतं कधीच पटत नाहीत. मुलाला बापाबद्दल राग असतो. तर मुलगा आपलं काहीच ऐकत नाही म्हणून बापही वैतागलेला असतो. ट्रेलरमध्ये ट्विस्ट निर्माण होतो ज्यावेळी मुलगा त्याच्या गर्लफ्रेंडला बाबांसमोर भेटायला आणतो. अशाप्रकारे 'द मेहता बॉईज' सिनेमात बाप-लेकाची भावुक कहाणी पाहायला मिळते.

'द मेहता बॉईज' कधी अन् कुठे बघायला मिळेल?

'द मेहता बॉईज' सिनेमा ओटीटीवर रिलीज होणार आहे. प्राइम व्हिडीओ या ओटीटी प्लॅटफॉर्मवर हा सिनेमा रिलीज होणार आहे. ७ फेब्रुवारीला हा सिनेमा प्राइम व्हिडीओवर रिलीज होणार आहे. या सिनेमात बोमन इराणी प्रमुख भूमिकेत असून त्यांच्यासोबत श्रेया चौधरी, अविनाश तिवारी या कलाकारांची प्रमुख भूमिका आहे. पहिला दिग्दर्शकीय सिनेमा 'द मेहता बॉईज'च्या माध्यमातून बोमन इराणी कशी छाप पाडणार, याची उत्सुकता आहे.

टॅग्स :बोमन इराणीअ‍ॅमेझॉनबॉलिवूड