Join us

वेफरच्या दुकानात सुरु झाली होती बोमन इराणी यांची प्यारवाली लव्हस्टोरी, परीक्षा संपल्यानंतर केलं होतं प्रपोज

By ऑनलाइन लोकमत | Published: September 06, 2020 8:00 AM

बोमन इराणी यांनी वयाच्या 42 व्या वर्षी अभिनय क्षेत्रात पाऊल ठेवले.

बोमन इराणी यांनी वयाच्या 42 व्या वर्षी अभिनय क्षेत्रात पाऊल ठेवले. लहानपणापासूनच बोमन यांना अ‍ॅक्टिंग व फोटोग्राफीची आवड होती. 1987 मध्ये त्यांनी फोटोग्राफी सुरु केली. सुरुवातीच्या काळात रस्त्यावर 25 रूपयांत त्यांनी फोटो विकले. याच काळात त्यांनी हंसराज सिधियाच्या मार्गदर्शनाखाली स्टेज अ‍ॅक्टिंग शिकली. सन २००० सालापासून त्यांनी पूर्णवेळ अभिनय करण्याचा निर्णय घेतला. फारसा प्रसिद्ध अभिनेता नसतानाही विधू विनोद चोप्राने त्यांना‘मुन्नाभाई एम.बी.बी.एस’ची पटकथा पूर्ण होण्याआधीच दोन लाख रुपये मानधनासह कास्ट केले होते. 

मुन्नाभाई एमबीबीएस, थ्री इडियट्स, शीरिन फरीदी की तो निकल पडी अशा अनेक चित्रपटातून आपली छाप पाडणारे बोमन इराणी. आज आम्ही तुम्हाला बोमन इराणी यांची लव्हस्टोरी सांगणार आहोत. इंडिया टीव्हीच्या रिपोर्टनुसार बोमन यांनी सांगितले की, पहिल्याच डेटवर प्रपोज केले होते. जेनोबिया जेव्हा त्यांच्या वेफरच्या दुकानात आली होती तेव्हा तिला पहिल्यांदाच पाहताना मी तिच्या प्रेमात पडलो होतो.  काही दिवसांत जेनोबिया माझ्या दुकानात रोज येऊ लागली होती आणि मला हे कळून चुकले होते की तिला सुद्धा मी आवडायला लागलो आहे. मग आम्ही हळूहळू फोनवर बोलणं सुरु केले. आम्ही सगळ्या गोष्टींवर बोलायचो. 

जेनोबियाच्या बीएससीच्या पेपरच्या दरम्यान तिच्या वडिलांनी मला एक महिना फोनवर बोलू नका असे सांगितले होते. हे जरा कठीण होत पण मी माझ्या भावनांवर संयम ठेवला. परीक्षा संपल्यानंतर आम्ही जेव्हा पहिल्यांदा डेटवर गेलो तेव्हा मेन्यू ऑर्डर करायच्या आधी मी तिला लग्नासाठी प्रपोज केले. तिने सुद्धा मला लगेच होकार दिला होता. 

टॅग्स :बोमन इराणी