Join us

संपत्तीसाठी कोर्टात पोहोचले भावंड,याआधी राजीव कपूर यांच्या घटस्फोटाचा कोर्टाला द्यावा लागणार पुरावा

By ऑनलाइन लोकमत | Published: April 30, 2021 2:25 PM

अशात कपूर कुटुंबाशी निगडीत आणखी एक महत्त्वाची बातमी समोर येतेय. लहान भाऊ ऋषी कपूर (Rishi Kapoor) व राजीव कपूर (Rajeev Kapoor) यांच्या निधनानंतर रणधीर कपूर यांनी एक मोठा निर्णय घेतल्याचे कळतेय.

सोमवारी दिवंगत राजीव कपूर यांच्या मालमत्तेवरील हक्कासाठी रणधीर आणि रीमा यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली. न्या़ गौतम पटेल यांनी संबंधित याचिकेवर सुनावणीही केली. यादरम्यान राजीव कपूर यांच्या मालमत्तेवर फक्त भाऊ-बहीणच हक्क दाखवू शकतात, असा युक्तिवाद  रणधीर व रीमा जैन यांच्या वकीलांनी केला.

राजीव कपूर यांनी 2001 मध्ये आरती सभरवालसोबत लग्न केले होते. आरती सबरवाल एक आर्किटेक्ट आहेत. राज कपूर यांचा या लग्नाला विरोध होता. पण तरीही राजीव यांनी आरती यांच्याशी लग्न केले. अर्थात हे लग्न फार काळ टिकले नाही. दोन वर्षातच दोघांचाही घटस्फोट झाला. आरती सध्या कॅनडामध्ये राहतात, असे कळते.राजीव आणि आरती यांना मुलबाळही नव्हते. त्यामुळे राजीव यांच्या नावे असलेली संपत्ती  कपूर घराण्याच्या नावे केली जावी, असे रणधीर आणि रीमा यांनी आपल्या याचिकेत म्हटले आहे. 

दरम्यान राजीव कपूर यांच्या संपत्तीवर हक्क मिळवण्यासाठी कपूर कुटुंबाला आधी राजीव कपूर यांच्या घटस्फोटाची कागदपत्र जमा करावी लागणार आहेत.विशेष म्हणजे यात कोणत्याच सदस्याला राजीव कपूर यांनी हे कागदपत्र कुठे ठेवले आहेत.याविषयी माहिती नसल्यामुळे त्यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे.

हायकोर्टाने राजीव कपूर यांच्या घटस्फोटाचे कागदपत्र मागितल्यानंतर रणधीर कपूर यांनी मीडियाला सांगितले की,  राजीवचा घटस्फोट कोणत्या फॅमिली कोर्टात झाला ?  कोणत्याच सदस्याला घटस्फोटाच्या कागदपत्रा विषयी माहिती नसल्यामुळे सध्या सगळेच याचा शोध घेत असल्याचे सांगितले.

राजीव कपूर घटस्फोट घेतल्यानंतर रणधीर कपूर बरोबरच राहत होते. राजीव कपूर मिळून पाच भावंड होती. यात गेल्याच वर्षी ऋषी कपूर यांचे निधन झाले. त्यांच्यापाठोपाठ या वर्षाच्या सुरुवातीला राजीव कपूर यांचे निधन झाले.याआधी बहिण रितू नंदाचे निधन झाले. कपूर भावंडामध्ये आता फक्त रणधीर कपूर आणि रीमा कपूर आहेत.

भावांच्या निधनानंतर एकाकी पडलेल्या रणधीर कपूर यांनी घेतला मोठा निर्णय, जाणून घ्या काय?

रणधीर कपूर (Randhir Kapoor ) सध्या कोरोनाला झुंज देत आहेत. कोरोना रिपोर्ट पॉझिटीव्ह आल्यानंतर त्यांना मुंबईच्या कोकिळाबेन रूग्णालयात दाखल करण्यात आलेय. तिथे त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. रणधीर यांच्यासोबत त्यांचे पाच स्टाफ मेंबर्सही पॉझिटीव्ह आढळले आहेत. अशात कपूर कुटुंबाशी निगडीत आणखी एक महत्त्वाची बातमी समोर येतेय. लहान भाऊ ऋषी कपूर (Rishi Kapoor) व राजीव कपूर (Rajeev Kapoor) यांच्या निधनानंतर रणधीर कपूर यांनी एक मोठा निर्णय घेतल्याचे कळतेय.

टॅग्स :रणधीर कपूरराजीव कपूर