दिवंगत अभिनेत्री श्रीदेवी व बोनी कपूर यांची मुलगी जान्हवी कपूरने गेल्या वर्षी धडक चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते. या चित्रपटाला बॉक्स ऑफिसवर खूप चांगला प्रतिसाद मिळाला. जान्हवी सोशल मीडियावर सक्रीय असते आणि जिममधील वर्कआऊटचे व्हिडिओ शेअर करत असते. काही दिवसांपूर्वी जान्हवी बहिण खुशीसोबत नेहा धुपियाच्या चॅट शोमध्ये सहभागी झाली होती. त्यावेळी बोनी कपूर तिच्या पायावरून तिला चिडवायचे , यामागचे कारण सांगितले. जान्हवी म्हणाली की, लहानपणी माझे वडील बोनी कपूर माझ्या पायांची खूप खिल्ली उडवायचे. ते बोलायचे की चिकन लेग्स. त्यामुळे मी माझ्या पायांवर खूप मेहनत घेतली. तिने नेहा धुपियाच्या शोमध्ये तिला मिळणाऱ्या चाहत्यांच्या प्रेमामुळे खूप खूश असल्याचे सांगितले.
सूत्रांच्या माहितीनुसार, जान्हवी सहा ते सात किलो वजन वाढवणार आहे. या चित्रपटात जान्हवीला पाहणे कमालीचे ठरणार आहे