Join us

झक्कास! 'मिस्टर इंडिया'चा सिक्वल येणारच, बोनी कपूर यांनी दिले संकेत

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 31, 2024 17:42 IST

बोनी कपूर हे बॉलिवूडमधील लोकप्रिय निर्मात्यांपैकी एक आहेत.

बोनी कपूर हे बॉलिवूडमधील लोकप्रिय निर्मात्यांपैकी एक आहेत.  बोनी कपूर सध्या आपल्या अनेक प्रोजेक्ट्समुळे चर्चेत आहेत. नुकतेच बोनी कपूर यांनी  'मिस्टर इंडिया' या क्लासिक चित्रपटाच्या दुसऱ्या भागाबाबत एक मोठे अपडेट दिलं आहे.  बॉलिवूडमधील अनेक गाजलेल्या सिनेमांपैकी एक म्हणजे 'मिस्टर इंडिया' या सिनेमाने प्रेक्षकांना अक्षरश: वेड लावलं होतं.

बोनी कपूर यांनी नुकतच्या दिलेल्या एका मुलखतीदरम्यान 'मिस्टर इंडिया' या सिनेमासंदर्भात भाष्य केलं आहे. ते म्हणाले, 'आम्हाला मिस्टर इंडियाच्या सिक्वेलसाठी अनेक ऑफर मिळत आहेत. एका हॉलिवूड स्टुडिओने आम्हाला एक मोठी ऑफर दिली आहे. तुम्हा सर्वांना एक-दोन वर्षांत या सिक्वेलबद्दल चांगली बातमी ऐकायला मिळेल.माझ्या क्रू सदस्यांना वाटते की हा चित्रपट बनू नये. कारण आता श्रीदेवी, अमरीश पुरी आणि सतीश कौशिक यांचं निधन झालं आहे. पण या चित्रपटाबाबत मी आणखी काही योजना आखल्या आहेत'.

पुढे ते म्हणाले, 'नो एन्ट्री या चित्रपटाचा सिक्वेल लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. मी माझा भाऊ अनिलला नो एंट्रीच्या सिक्वेलबद्दल आणि त्यातील स्टारकास्टबद्दल सांगण्याआधीच ही बातमी लिक झाली. त्यामुळे तो चिडला. ते लीक होणे दुर्दैवी होतं. मला माहित आहे की त्याला नो एंट्रीच्या सिक्वेलचा भाग व्हायचं होतं, पण जागा नव्हती. मी जे केले ते मी का केले हे मला स्पष्ट करायचं होतं, पण त्याआधीच त्याला ही बातमी समजली. अनिल मात्र माझ्याशी अजूनही बोलत नाहीये. पण तो हे सगळं समजून घेईल आणि लवकरच सगळं सुरळीत होईल, असा आशावाद देखील यावेळी बोनी कपूर यांनी व्यक्त केला आहे. 

दरम्यान १९८७ मध्ये शेखर कपूर दिग्दर्शित आणि बोनी कपूर निर्मित 'मिस्टर इंडिया' हा चित्रपट प्रदर्शित झाला. सुपरहिरोच्या संकल्पनेवर आधारित हा अनोखा चित्रपट आजही सिनेरसिकांचा आवडता सिनेमा आहे. 'मिस्टर इंडिया'ची कथा आणि पटकथा सलीम-जावेद या जोडीने लिहिली होती. आता 'मिस्टर इंडिया २' लवकरच येणार असल्याचे संकेत बोनी कपूर यांनी दिले आहेत. यावर काम सुरू आहे. मात्र सिनेमात कुणाला कास्ट केले जाईल, याविषयी अद्याप कोणतीही माहिती समोर आलेली नाही

 

टॅग्स :बोनी कपूरअनिल कपूरश्रीदेवीसेलिब्रिटीबॉलिवूड