Join us

"स्क्रीनवर चांगली दिसण्यासाठी ती...", श्रीदेवीच्या मृत्यूबाबतीत बोनी कपूर यांचा धक्कादायक खुलासा

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 17, 2025 14:09 IST

"श्रीदेवीला याआधीही सतत चक्कर यायची...", बोनी कपूर यांनी केले अनेक खुलासे

सिनेमा जगतातील 'चांदनी' अभिनेत्री श्रीदेवीचा (Sridevi) २०१८ साली मृत्यू झाला. दुबईतील हॉटेलमध्ये असताना बाथटमबमध्ये तिचा मृतदेह आढळून आला. तेव्हा तिच्यासोबत बोनी कपूरही होते. नंतर अनेकांनी बोनी कपूर यांच्यावर संशय घेतला होता. मात्र तिचा अपघाती मृत्यू झाल्याचं त्यांनी स्पष्ट केलं होतं. नुकतंच एका मुलाखतीत बोनी कपूर (Boney Kapoor) यांनी श्रीदेवी क्रॅश डाएटवर असल्याने सतत चक्कर येऊन पडायची असा खुलासा केला. ते नक्की काय म्हणाले वाचा.

'द न्यू इंडियन'शी बोलताना बोनी कपूर यांनी श्रीदेवीच्या मृत्यूचं गूढ उकललं. ते म्हणाले, "ती बऱ्याचदा भुकेली असायची. तिने आहारात मीठ खाणंच सोडलं होतं. स्क्रीनवर आपण चांगलं दिसावं म्हणून ती क्रॅश डाएट करायची. जेव्हापासून आमचं लग्न झालं तिला अनेकदा चक्कर यायची. डॉक्टर नेहमी सांगायचे की तिला लो बीपी आहे. दुर्दैवाने तिने हे गांभीर्याने घेतलं नाही."

ते पुढे म्हणाले, "ती घटना घडल्यानंतर जेव्हा नागार्जुन आमच्या घरी आले होते तेव्हा त्यांनीही आठवण सांगितली की श्रीदेवी त्यांच्यासोबत सिनेमा करताना क्रॅश डाएटवर होती. तेव्हा ती चक्कर येऊन बाथरुममध्ये पडली आणि तिचा दात तुटला होता."

दुबईत श्रीदेवीच्या मृत्यूनंतर काय घडलं?

बोनी कपूर म्हणाले, "श्रीदेवीच्या निधनानंतर माझी २-३ दिवस चौकशी झाली. कारण माझ्यावर भारतातील मीडियाचा खूप दबाव होता. ्माझी लाय डिटेक्टर टेस्ट झाली आणि त्यानंतर मला पोलिसांकडून क्लीन चीट मिळाली. श्रीदेवीचा मृत्यू हा अपघातीच झाला होता."

टॅग्स :बोनी कपूरश्रीदेवीबॉलिवूडमृत्यू