Join us

पुन्हा एकदा देशभक्तीने प्रेक्षकांचा ऊर येणार भरुन; 'बॉर्डर 2' ची रिलीज डेट आली समोर

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 10, 2024 10:29 IST

Border 2: 1997 मध्ये रिलीज झालेल्या बॉर्डर या सिनेमाने बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला होता. त्यामुळे या सिनेमाच्या दुसऱ्या पार्टची नेटकरी आतुरतेने वाट पाहत आहेत.

1997 मध्ये रिलीज झालेल्या बॉर्डर या सिनेमाने बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला होता. जे.पी. दत्ता यांचा मल्टीस्टारर असलेला हा सिनेमा त्या काळात बराच गाजला. आजही या सिनेमातील गाणी लोक आवडीने ऐकतात. विशेष म्हणजे बॉलिवूडच्या इतिहासात लोकप्रिय ठरलेल्या या सिनेमाचा लवकरच दुसरा पार्टही प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.  नुकतीच या सिनेमाची रिलीज डेट समोर आली आहे.

सनी देओल, अक्षय खन्ना, सुनील शेट्टी, संजय दत्त, पूजा भट्ट, तब्बू असे अनेक सुपरस्टार या सिनेमात झळकले होते. या प्रत्येक कलाकाराने त्यांच्या अभिनयकौशल्याच्या जोरावर प्रेक्षकांची मनं जिंकून घेतली. त्यामुळे  बॉर्डर 2 ची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत आहेत. या नव्या सिनेमातही काही तरी नवीन पाहायला मिळेल याची आशा प्रेक्षकांना आहे. त्यामुळे या सिनेमाविषयी प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी चाहते उत्सुक असतात. यामध्येच सिनेमाच्या मेकर्सने या सिनेमाविषयी एक हिंट दिली आहे.

कधी रिलीज होणार  बॉर्डर 2 

बॉर्डर 2 या सिनेमात सनी देओल महत्त्वपूर्ण भूमिका साकारणार असून त्याच्यासोबत यावेळी आयुषमान खुराना स्क्रीन शेअर करणार आहे. टाइम्स ऑफ इंडियानुसार, बॉर्डर 2 साठी भूषण कुमार, जे. पी. दत्ता आणि निधी दत्ता एकत्र आले आहेत. तसंच या सिनेमाचं दिग्दर्शन अनुराग सिंह करत आहे. विशेष म्हणजे हा सिनेमा २३ जानेवारी २०२६ मध्ये प्रेक्षकांच्या भेटीला येण्याची शक्यता आहे. दरम्यान, बॉर्डर 2 मध्ये सनी देओल पुन्हा एकदा मेजर कुलदीप सिंह चंदूरी ही भूमिका साकारणार आहे. 

टॅग्स :बॉलिवूडसीमारेषासनी देओलसिनेमासेलिब्रिटीसुनील शेट्टी