‘रेड’ने आतापर्यंत बॉक्स आॅफिसवर ७१.०६ कोटी रुपयांची कमाई केली आहे, तर विदेशात जवळपास १२ कोटी रुपयांचा गल्ला जमविला आहे. अशात चित्रपटाची वर्ल्डवाइड कमाई ८३.०६ कोटी रुपये इतकी आहे. चित्रपटाचे एकूण बजेट ७० कोटी रुपयांचे असून, लवकरच चित्रपट शंभर कोटी रुपयांच्या क्लबमध्ये स्थान मिळवेल असे चित्र आहे. दरम्यान, ‘रेड’ हा चित्रपट यावर्षीचा दुसरा हायएस्ट ओपनर बनला आहे. रेडने पहिल्याच दिवशी १०.०४ कोटी रुपयांची कमाई करीत बॉक्स आॅफिसवर दबदबा दाखवून दिला. शनिवारी चित्रपटाने १३.८६ कोटी, तर रविवारी १७.११ कोटी रुपयांची कमाई केली. चित्रपटाचे दिग्दर्शन राजकुमार गुप्ता यांनी केले आहे. दरम्यान, चित्रपटाचे कौतुक करताना अजयची पत्नी काजोलने ट्विट करताना लिहिले होते की, ‘मला हा चित्रपट आवडला आहे. चित्रपट बघताना माझ्या चेहºयावर स्पष्टपणे हसू दिसत होते. मी सतत टाळ्या वाजवित होते.’}}}} ">.@ajaydevgn's #Raid manages to gross over 80 crore at the worldwide box-office. https://t.co/Kvhf84vi1H— Filmfare (@filmfare) March 21, 2018
BOX OFFICE : अजय देवगणने ‘रेड’ मारताच बॉक्स आॅफिसवर खळबळ; पाच दिवसांत कमावले इतके कोटी!
By ऑनलाइन लोकमत | Published: March 21, 2018 4:46 PM
अभिनेता अजय देवगण याने पुन्हा एकदा ‘रेड’च्या माध्यमातून सिद्ध केले की, बॉलिवूडमध्ये त्याचा प्रभाव अजूनही कायम आहे. कारण १६ ...
अभिनेता अजय देवगण याने पुन्हा एकदा ‘रेड’च्या माध्यमातून सिद्ध केले की, बॉलिवूडमध्ये त्याचा प्रभाव अजूनही कायम आहे. कारण १६ मार्च रोजी प्रदर्शित झालेल्या त्याच्या ‘रेड’ या चित्रपटाने केवळ पाचच दिवसांत जबरदस्त कमाई करीत बॉक्स आॅफिसवर खळबळ उडवून दिली आहे. चित्रपटाने ताबडतोब कमाई करताना केवळ पाचच दिवसांत वर्ल्डवाइड ८० कोटी रुपयांचा गल्ला जमविला आहे. अजयचा हा चित्रपट १९८० मध्ये आयकर विभागाकडून टाकलेल्या एका रेडवर आधारित आहे. ही पूर्णत: सत्य घटना असून, त्यास अजय देवगण पूर्णपणे न्याय देताना दिसून येत आहे. कारण त्याच्या दमदार अभिनयाचे सर्वच स्तरातून कौतुक केले जात आहे, तर अजयबरोबर चित्रपटात मुख्य भूमिकेत दिसत असलेली अभिनेत्री इलियाना डिक्रूज हिनेदेखील आपल्या भूमिकेला न्याय देताना जबरदस्त अभिनय केला आहे.