यूएसएमध्ये २६.७७ लाख, आॅस्ट्रेलियामध्ये १३.१५ लाख आणि न्यूझिलंडमध्ये ६.७६ लाख रुपयांची कमाई केली आहे. दरम्यान, वीकेण्डचे अजून दोन दिवस शिल्लक असल्याने चित्रपटाच्या कमाईच्या आकड्यांमध्ये वाढ होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. ‘रेड’ हा चित्रपट ८०च्या दशकात घडलेल्या एक सत्य घटनेवर आधारित आहे. आयकर विभागाकडून एका ठिकाणी ‘रेड’ टाकली जाते. यास आतापर्यंतची सर्वात लांबलचक प्रक्रिया असलेली रेड म्हणूनही संबोधले जाते. अभिनेता अजय देवगण चित्रपटात दमदार भूमिकेत असून, ज्याच्यावर प्रेक्षकांकडून कौतुकाचा वर्षाव केला जात आहे. मुळात अजय देवगणला अॅक्शन अभिनेता म्हणून ओळखले जाते. चित्रपटात तो काहीशा अशाच अंदाजात बघावयास मिळत आहे.}}}} ">. @ajaydevgn - @Ileana_Official 's #Raid is off to a good start at the Box office..Day 1 All-India Nett Early Estimates are pegged at ₹ 10.50 Crs..— Ramesh Bala (@rameshlaus) March 17, 2018
BOX OFFICE : अजय देवगणच्या ‘रेड’ने पहिल्याच दिवशी कमवले इतके कोटी!
By ऑनलाइन लोकमत | Published: March 17, 2018 7:51 AM
प्रसिद्ध अभिनेता अजय देवगण याने पहिल्याच दिवशी कमाल करताना जबरदस्त कमाई केली आहे, वीकेण्डच्या दोन दिवसांमध्ये कमाईत आणखी भर पडण्याची शक्यता आहे.
अभिनेता अजय देवगण याच्या ‘रेड’ या चित्रपटाने पहिल्याच दिवशी बॉक्स आॅफिसवर धमाल करताना जबरदस्त कमाई केली. ट्रेड एनालिस्ट रमेश बाळाने शनिवारी त्यांच्या आॅफिशियल ट्विटर अकाउंटवर लिहिले की, अजय देवगण आणि इलियाना डिक्रूजच्या ‘रेड’ या चित्रपटाने जबरदस्त ओपनिंग केली आहे. पहिल्याच दिवशी चित्रपटाने जवळपास १०.५० कोटी रुपयांची कमाई केली आहे. ‘रेड’मध्ये अजय जबरदस्त अभिनय करताना प्रेक्षकांची वाहवा मिळवित आहे. त्यामुळेच पहिल्याच दिवशी चित्रपटाचा ओवरसीज जबरदस्त राहिला आहे. रमेश बाळा यांनी आणखी एक ट्विट करताना आकड्यांची सविस्तर माहिती दिली आहे. अजय देवगणचे कौतुक यामुळेदेखील केले जात आहे की, ‘गोलमाल’ आणि ‘सिंघम’सारख्या मसाला चित्रपटात काम केल्यानंतर ‘दृश्यम’ आणि ‘रेड’सारख्या चित्रपटात अभिनय करून त्याने आपल्या अभिनयाचे कौशल्य दाखवून दिले आहे. त्याचबरोबर तो जमिनीशी जुळलेला अभिनेता असल्याचेही त्याने पुन्हा एकदा सिद्ध केले आहे. अजय देवगणचे चित्रपट वास्तविकतेशी संबंधित आहेत. ‘रेड’ या चित्रपटाचे दिग्दर्शन राजकुमार गुप्ता यांनी केले असून, हा चित्रपट १६ मार्च रोजी प्रदर्शित होणार आहे.