Join us

Avatar 2 Vs Drishyam 2: ‘अवतार 2’ सुसाट, पण अजय देवगणच्या ‘दृश्यम 2’ने नाही मानलेली हार...!!

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 26, 2022 17:11 IST

Avatar 2 Vs Drishyam 2 Box Office Collection :  ‘अवतार 2’ने काल रिलीजच्या 10 व्या दिवशीही शानदार कमाई केली. रणवीर सिंगचा ‘सर्कस’चा बार फुसका ठरला. पण अजय देवगणचा ‘दृश्यम 2’ हा सिनेमा मात्र अद्यापही शर्यतीत टिकून आहे. 

Avatar 2 Vs Drishyam 2 Box Office Collection : ‘अवतार 2’ या सिनेमाच्या वर्ल्डवाईड कमाईबद्दल  विचारूच नका. या सिनेमानं जगभरात छप्परफाड कमाई केली आहे. होय, सिनेमाचं वर्ल्डवाईड कलेक्शन 7 हजार कोटींवर पोहोचलं आहे. भारतातही या सिनेमानं बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला आहे.  ‘अवतार 2’ने काल रविवारी रिलीजच्या 10 व्या दिवशीही शानदार कमाई केली. रणवीर सिंगचा ‘सर्कस’चा बार फुसका ठरला. पण अजय देवगणचादृश्यम 2’ हा सिनेमा मात्र अद्यापही शर्यतीत टिकून आहे. 

‘अवतार 2’ लवकरच 300 कोटी क्लबमध्ये!जबरदस्त व्हीएफएक्सने खिळवून ठेवणाऱ्या ‘अवतार 2’ने रिलीजच्या 10 व्या दिवशीही शानदार कमार्द केली.  16 डिसेंबरला रिलीज झालेल्या या सिनेमाने काल रविवारी भारतात सर्व भाषेत 25.15 कोटींचा बिझनेस केला. याचसोबत ‘अवतार 2’ची एकूण कमाई 252.85 कोटींवर पोहोचली आहे. कमाईचा हा वेग असाच कायम राहिला तर हा हॉलिवूड सिनेमा लवकरच 300 कोटी क्लबमध्ये सामील होईल, असा विश्वास जाणकारांनी व्यक्त केला  आहे.

अजयचा ‘दृश्यम 2’ देखील मागे नाही...अजय देवगणचा ‘दृश्यम 2’ हा सिनेमा गेल्या महिन्यात 18 तारखेला रिलीज झाला. रिलीजच्या 38 दिवसानंतरही हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर टिकून आहे. काल रविवारी या सिनेमाने 1.66 कोटींची कमाई केली. याचसोबत या सिनेमाचं एकूण कलेक्शन 227.94 कोटींवर पोहोचलं आहे. हैदराबाद, चेन्नई, कोलकाता, मुंबई, बेंगळूरू व पुण्यात अद्यापही हा सिनेमा गर्दी खेचतोय.

‘सर्कस’ फुस्स...रोहित शेट्टीने दिग्दर्शित केलेला आणि रणवीर सिंगची मुख्य भूमिका असलेला ‘सर्कस’ने गेल्या तीन दिवसांत 20.85 कोटींची कमाई केली आहे. 23 डिसेंबरला हा सिनेमा रिलीज झाला. पहिल्या दिवशी या सिनेमाने 6.25 कोटी कमावले. दुसऱ्या दिवशी 6.40 कोटी आणि काल रविवारी तिसऱ्या दिवशी 8.20 कोटींचा बिझनेस केला.

टॅग्स :दृश्यम 2बॉलिवूडहॉलिवूडअजय देवगण