गुरूवारी सकाळी ट्विटरवर #BoycottErosNow ट्रेंड करू लागला. या हॅशटॅगसह नेटक-यांनी ‘इरॉस नाऊ’ला बायकॉट करण्याची मागणी लावून धरली. यानंतर काय तर वाद अंगलट येण्याची चिन्हे दिसताच ‘इरॉस नाऊ’ला माफी मागावी लागली. हा वाद सुरु झाला एका ट्विटने.
तर ‘इरॉस नाऊ’ने नवरात्रीनिमित्त एक पोस्ट शेअर केली आणि ही पोस्ट पाहून नेटकरी भडकले. अभिनेत्री कतरिना कैफच्या अर्धनग्न फोटोसह ‘इरॉस नाऊ’ने एक पोस्ट केली. “Do you want to put the ratri in my Navratri”, असे प्रश्न या पोस्टमध्ये विचारण्यात आला होता. मग काय? ही पोस्ट वाचून सोशल मीडियावर राडा सुरु झाला.
यानंतर थोड्याच वेळात ‘बॉयकॉट इरॉस नाऊ’ हा हॅशटॅग ट्रेंड करू लागला. लोकांनी ‘इरॉस नाऊ’चे काही जुने ट्विटही शोधून काढले. ईदच्या मुहूर्तावर ‘इरॉस नाऊ’ने दिलेल्या शुभेच्छा आणि आता नवरात्रीबद्दल केलेल्या या पोस्टची तुलना करत लोकांनी ‘एरोस नाऊ’ला फैलावर घेतले.
मागितली माफीसोशल मीडियावरच्या संतप्त प्रतिक्रिया बघताच ‘इरॉस नाऊ’ने नवरात्रीसंदर्भातील आपले वादग्रस्त ट्विट डिलीट केले. सोबत माफीनामाही शेअर केला. आम्ही सर्व धर्मांचा समान आदर करतो. कोणाच्याही धार्मिक भावना दुखावण्याचा आमचा हेतू नव्हता. आम्ही वादग्रस्त पोस्ट डिलीट केली आहे. आमच्या पोस्टमुळे भावना दुखावल्या असतील तर आम्ही माफी मागतो, असे या माफीनाम्यात लिहिले आहे. या माफीनाम्यानंतरही लोकांचा राग शांत झाला नाही. याऊपरही ‘इरॉस नाऊ’वर बहिष्कार टाकण्याची मागणी सुरु आहे.
हाथी मेरे साथीचे मोशन पोस्टर...इरॉस नाऊने ‘हाथी मेरे साथी’ या आपल्या नव्या सिनेमाचे पोस्टर काल बुधवारी रिलीज केले होते. राजेश खन्ना व तनुजाच्या ‘हाथी मेरे साथी’ या सिनेमाशी मिळत्याजुळत्या या चित्रपटात राणा दुग्गबाती व पुलकित सम्राट मुख्य भूमिकेत आहेत. या सिनेमाचे प्रमोशन सुरु होण्याआधीच इरॉस नाऊने आपल्या पोस्टमुळे वाद ओढवून घेतला.