हृतिक रोशन (Hrithik Roshan) व सैफ अली खान ( Saif Ali Khan) स्टारर ‘विक्रम वेधा’ (Vikram Vedha) हा सिनेमा येत्या शुक्रवारी चित्रपटगृहांत धडकणार आहे. पण त्याआधी पुन्हा एकदा सोशल मीडियावरची ‘बायकॉट गँग’ अॅक्टिव्ह झाली आहे. ‘विक्रम वेधा’ला बायकॉट (Boycott Vikram Vedha) करण्याची मागणी जोर धरू लागली आहे. यामागचं सर्वांत मोठं कारण म्हणजे, ‘विक्रम वेधा’ हा साऊथच्या याच नावानं बनलेल्या सिनेमाचा हिंदी रिमेक आहे.
साऊथच्या सिनेमात आर. माधवन आणि विजय सेतुपतीने जबरदस्त अभिनय केला होता. अशात सोशल मीडिया युजर्सनी हृतिक रोशन व सैफच्या ‘विक्रम वेधा’ला ‘चीप कॉपी पेस्ट’ म्हणत ट्रोल करायला सुरूवात केली आहे. अशात आता सैफ व करिना कपूरचा एक जुना व्हिडीओ व्हायरल होतोय आणि हा व्हिडीओ पाहून नेटकरी संतापले आहेत.
या व्हिडीओत सैफ अली खान आपल्या मुलांच्या नावांवर बोलतोय. ‘मी माझ्या मुलाचं नाव अलेक्झांडर ठेऊ शकत नाही आणि रिअॅलिस्टिकली राम असंही ठेवू शकत नाही. मग एक चांगलं मुस्लिम नाव का नको?’ असा प्रश्न सैफ या व्हिडीओत विचारताना दिसतोय. याच व्हिडीओ करिना तैमूरचं नाव मोठ्या अभिमानाने घेताना दिसतेय.तुम्हाला ठाऊक असेलच की, सैफ व करिनाने आपल्या पहिल्या मुलाचं नाव तैमूर ठेवलं तेव्हा यावरून मोठा वाद निर्माण झाला होता. तैमूर लंग हा चौदाव्या शतकाचा एक शासक होता ज्यानं तैमुरी घराण्याची स्थापना केली होती. तो खूप अत्याचारी आणि निर्दयी असल्याचे म्हटलं जातं. सैफिनाने अशा शासकाच्या नावावर आपल्या मुलाचं नाव ठेवावं, यावर लोकांचा आक्षेप होता.
सैफचा हा जुना व्हिडीओ पाहून नेटकरी बिथरले आहेत. यावर कमेंट्स करताना अनेकांनी सैफच्या ‘विक्रम वेधा’ या सिनेमाला बायकॉट करण्याची मागणी केली आहे.
‘बायकॉट व्रिकम वेधा’ होतंय ट्रेंडतूर्तास एक ना अनेक कारणांनी ‘विक्रम वेधा’वर बहिष्कार टाकण्याची मागणी युजर्स करत आहेत. पुन्हा एकदा रिमेक, बॉलिवूड सुधरणार नाही, असं म्हणत एका युजरने ‘विक्रम वेधा’वर बहिष्कार टाकण्याची मागणी केली आहे.
कॉपी सिनेमा बघण्यासाठी कोण पैसा खर्च करणार, आम्ही फक्त ऐश्वर्याचा पोन्नियीन सेल्वन बघणार, असं एका युजरने म्हटलं आहे.दरम्यान ‘विक्रम वेधा’चं अॅडव्हान्स बुकिंग सुरू झालं आहे. पहिल्या दिवशी अॅडव्हान्स बुकिंगमधून या चित्रपटाने 45 लाखाची कमाई केली. नॅशनल सिनेमा डे (23 सप्टेंबर) निमित्त चित्रपटांच्या तिकिटाचा दर 75 रूपये केला गेला होता. यानंतर प्रेक्षकांच्या चित्रपटगृहाबाहेर रांगा लागल्या होत्या. हे बघता, ‘विक्रम वेधा’च्या मेकर्सनी तिकिटाचे दर कमी केले आहेत. ‘विक्रम वेधा’ 30 सप्टेंबरला चित्रपटगृहांत रिलीज होतोय.