Brahmastra Box Office Collection : रणबीर कपूर ( Ranbir Kapoor ) व आलिया भटचा ( Alia Bhatt) ‘ब्रह्मास्त्र’ (Brahmastra ) हा सिनेमा 9 सप्टेंबरला रिलीज आला आणि पाठोपाठ या चित्रपटाच्या बॉक्स ऑफिसवर कलेक्शनचे आकडे समोर आलेत. गेल्या काही दिवसांत बॉलिवूडचे अनेक बडे सिनेमे दणकून आपटले. पण ‘ब्रह्मास्त्र’ने पहिल्याच दिवशी वर्ल्डवाईड 76 कोटींची कमाई केली. चित्रपटाच्या हिंदी व्हर्जनने पहिल्या दिवशी 32.5 ते 32.5 कोटींचा बिझनेस केला तर दुसऱ्या दिवशी 37.5 ते 38.5 कोटींचा गल्ला जमवला. ‘ब्रह्मास्त्र’ ची बॉक्स ऑफिसवरची ही कमाई पाहून मेकर्सच्या चेहऱ्यावरचा आनंद ओसंडून वाहतोय. पण तिकडे सोशल मीडियावर मात्र वेगळीच चर्चा सुरू झाली आहे. ट्विटरवर चित्रपटगृहांच्या आतले एक ना अनेक व्हिडिओ व्हायरल होत आहेत.
होय, ‘ब्रह्मास्त्र’चे बॉक्स ऑफिसवरचे आकडे फेक असल्याचा दावा युजर्स करत आहेत. अनेकांनी पुराव्यादाखल रिकाम्या चित्रपटगृहांचे व्हिडीओ शेअर करण्याचा धडाका लावला आहे.
थिएटर्स असे ओस पडले आहेत आणि त्यामुळेच बॉक्स ऑफिसवरच्या कलेक्शनचे आकडे फेक आहेत, खोटे आहेत, असा युजर्सचा दावा आहे. अशात आलिया व रणबीरचे चाहतेही मैदानात उतरले आहेत. बॉक्स ऑफिसवर कलेक्शनचे आकडे फेक नसून खाली थिएटर्सचे हे व्हिडीओच फेक असल्याचं या चाहत्यांनी म्हटलं आहे. एकंदर काय तर सध्या ‘ब्रह्मास्त्र’च्या कमाईवरून सोशल मीडियावर युजर्स एकमेकांशी भिडले आहेत.
एका युजरने आपल्या ट्विटर हँडलवर थिएटरच्या आतला व्हिडीओ शेअर केला आहे. व्हिडीओत चित्रपट सुरू आहे. देवा देवा गाणं ऐकू येतंय. पण थिएटर पूर्णपणे रिकामं आहे. बॉलिवूडचं भविष्य असंच असणार, असं हा व्हिडीओ शेअर करत संबंधित युजरने लिहिलं आहे.
रणबीर व आलियाच्या चाहत्यांनी हा व्हिडीओ खोटा असल्याचा दावा केला आहे. आता कोण खरं? कोण खोटं? हे तर आम्हाला ठाऊक नाही. पण सोशल मीडियावर सध्या याचीच चर्चा सुरू आहे, हे मात्र नक्की.
‘ब्रह्मास्त्र’ हा सिनेमा 410 कोटी बजेटमध्ये बनला आहे. चित्रपटाच्या हिंदी व्हर्जनने दोन दिवसांत 68 कोटींचा बिझनेस केल्याचं म्हटलं जात आहे. एकूण बिझनेसचं म्हणाल तर चित्रपटाने 76 कोटी कमावले आहेत. हे आकडे खरे असतील तर लवकरच ‘ब्रह्मास्त्र’ हा सिनेमा 100 कोटी क्लबमध्ये सामील होणार आहे.