Brahmastra box office collection Day 2: आलिया भट (Alia bhatt) आणि रणबीर कपूरचा (Ranbir Kapoor) यावर्षातील सर्वात मोठा सिनेमा ‘ब्रह्मास्त्र’ रिलीज झाला आहे. गेल्या सहा वर्षांपासून या चित्रपटाची चर्चा होती. मुळात चित्रपट बनायलाच 4 वर्षे लागलीत. दिग्दर्शक अयान मुखर्जीची 6 वर्षांची मेहनत यशस्वी ठरताना दिसत आहेत. भारतातच नव्हे तर विदेशातही चित्रपट जबरदस्त कमाई करत आहे. बायकॉट बॉलिवूड ट्रेंडमध्ये असताना चित्रपटाने पहिल्या दिवशी चांगली कमाई केली होती. दुसऱ्या दिवशीही चित्रपटाने पहिल्या दिवशीपेक्षा अधिक कमाई केली आहे.पहिल्या दिवशी ‘ब्रह्मास्त्र’ने वर्ल्डवाईड 75 कोटींचा बिझनेस केला होता. भारतीय बॉक्स ऑफिसवर या चित्रपटाने 36.50 कोटींचा गल्ला जमवला होता. यात एकट्या हिंदी व्हर्जनने 31.50 कोटींची कमाई केली होती.
दुसऱ्या दिवशीच्या कमाईबद्दल बोलाल तर दुसऱ्या दिवशी या चित्रपटाने सुमारे 41.25 ते 43.15 कोटी कमावले आहेत. यात हिंदी व्हर्जनचा वाटा 37 ते 38 कोटी सांगितला जात आहे. शनिवारी केवळ हिंदी व्हर्जनने 37.50 कोटींचा बिझनेस केला. ‘ब्रह्मास्त्र’ने हिंदीत दोन दिवसांत जवळपास 69.50 कोटींची कमाई केली आहे. त्यामुळे या आठवड्याअखेर हा चित्रपट 110 कोटींचा आकडा पार करेल असा विश्वास आहे.
पाहायला मिळतेय जबरदस्त क्रेझ‘ब्रह्मास्त्र’ या चित्रपटाबद्दल चाहत्यांमध्ये जबरदस्त क्रेझ पाहायला मिळते आहे. फॅन्स चित्रपट पहायला इतके उत्सुक आहेत की, थिएटर्समध्ये पब्लिक डिमांडवर स्पेशल शो चालवले जात आहे. आलिया भटने एक इन्स्टा स्टोरी शेअर केली आहे.‘ब्रह्मास्त्र’चं पोस्टर शेअर करत, पब्लिक डिमांडवर पीव्हीआरमध्ये दोन स्पेशल शो ठेवण्यात आल्याचं या इन्स्टास्टोरीत तिने लिहिलं आहे. पहिला मध्यरात्रीनंतर 2.30 वाजता आणि दुसरा पहाटे 5.45 वाजताचा शो ठेवण्यात आला असल्याची माहिती तिने दिली आहे.‘ब्रह्मास्त्र’ या सिनेमात आलिया व रणबीर मुख्य भूमिकेत आहेत. याशिवाय अमिताभ बच्चन, मौनी रॉय, नागार्जुन यांच्याही महत्त्वपूर्ण भूमिका आहेत. शाहरूख खान हा सुद्धा कॅमिओ रोलमध्ये आहे.