अभिनेता रणबीर कपूर (Ranbir Kapoor) आणि अभिनेत्री आलिया भट (Alia Bhatt) यांचा आगामी चित्रपट 'ब्रह्मास्त्र' (Brahmastra) रिलीज होण्यापूर्वीच खूप चर्चेत आहे. सोशल मीडियावर चित्रपटाच्या स्टारकास्टचा फर्स्ट लूक पाहायला मिळत आहेत. नुकताच अमिताभ बच्चन यांचा लूक समोर आला होता. आता निर्माता करण जोहरने या चित्रपटातील नागार्जुनचा (Nagarjun Akkineni) फर्स्ट लूक शेअर केलाय. या चित्रपटात नागार्जुन दमदार अंदाजात दिसतो आहे.
ब्रह्मास्त्रमधील नागार्जुनचा लूक नुकताच समोर आला आहे. ही झलक पाहून चित्रपटात नक्कीच काहीतरी दमदार पाहायला मिळणार आहे, असा अंदाज चाहते बांधत आहेत. नागार्जुन मोठ्या गॅपनंतर हिंदी चित्रपटात पहायला मिळणार आहे.
अयान मुखर्जीने 'ब्रम्हास्त्र' चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे. तर, करण जोहरने या चित्रपटाची निर्मिती केली आहे. आलिया आणि रणबीर व्यतिरिक्त अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan), मौनी रॉय (Mouni Roy), नागार्जुन अक्किनेनी (Nagarjun Akkineni) या चित्रपटात महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत.
'ब्रह्मास्त्र' हा तीन भागांचा फँटसी सिनेमा आहे, ज्यामध्ये रणबीर शिवाच्या मुख्य भूमिकेत दिसणार आहे. तर, आलिया भट ईशाच्या भूमिकेत आहे, जी त्याची मैत्रीण आहे. अमिताभ बच्चन हे प्रोफेसर अरविंद चतुर्वेदी आहेत आणि नागार्जुन पुरातत्व शास्त्रज्ञ आहे, त्याचे नाव ‘अजय वशिष्ठ’ आहे. मौनीच्या पात्राचे नाव दमयंती आहे. हा चित्रपट 9 सप्टेंबरला रिलीज होणार आहे.