Join us

सलमान खानसोबतची ‘ती’ कोण? पाहा, हॉट फोटो

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 8, 2020 16:00 IST

सलमान खानची एक जाहिरात टीव्हीवर धुमाकूळ घालतेय. याचे कारण म्हणजे, सलमानसोबतची ‘ती’.

ठळक मुद्देलेरिसा एक ब्राझिलियन मॉडेल व डान्सर आहे. सोशल मीडियावर ती प्रचंड अ‍ॅक्टिव्ह आहे.

सलमान खानची एक कमर्शिअल जाहिरात टीव्हीवर धुमाकूळ घालतेय. याचे कारण म्हणजे, सलमानसोबतची ‘ती’.  मोबाईल फोनच्या या एका जाहिरातीसाठी सलमानने म्हणे, प्रतिदिन 7 कोटी रूपये फी घेतली. जाहिरातीत एक सुंदर युवती सलमानसोबत दिसतेय. सलमानचा फोन घेऊन ती पळते आणि भाईजान तिचा पाठलाग करून तिला पकडतो. शेवटी तिच्या हातात बेड्या ठोकतो. सलमानसोबतची ती कोण, हा प्रश्न तुम्हाला पडला असेल तर तिचे नाव आहे लेरिसा बोन्सी.

लेरिसा ही एक आंतरराष्ट्रीय मॉडेल आहे. अलीकडे गुरु रंधावाच्या ‘सुरमा सुरमा’ या म्युझिक व्हिडीओत ती झकळली होती. त्याआधी अक्षय कुमार व जॉन अब्राहमसोबत ‘सुबह होने ना दे’ या गाण्यात थिरकताना ती दिसली होती.

या गाण्यातील तिचे सुपर डान्स मुव्स पाहून सगळेच तिच्यावर फिदा झाले होते. यानंतर टायगर श्रॉफ व सूरज पांचोलीसोबत ‘डिम डिम’ या गाण्यात ती दिसली.

लेरिसा बोन्सी बॉलिवूडमध्ये पाय रोवण्याचे प्रयत्न करतेय. बॉलिवूडच्या अनेक पार्ट्यांना ती दिसते. चित्रपटात  हिरोईन म्हणून काम करण्याची तिची इच्छा होती. याची सुरुवात तिने ‘गो गोवा गॉन’ या चित्रपटातून केली होती.

या चित्रपटात सैफ अली खान, कुणाल खेमू व वीरदाससोबत ती दिसली होती. साऊथच्या काही चित्रपटातही ती दिसली.

लेरिसा एक ब्राझिलियन मॉडेल व डान्सर आहे. सोशल मीडियावर ती प्रचंड अ‍ॅक्टिव्ह आहे. रोज नवे हॉट फोटो व व्हिडीओ शेअर करून ती चाहत्यांच्या संपर्कात असते. फिटनेस फ्रिक असलेल्या लेरिसाच्या फिटनेस व्हिडीओवरही चाहत्यांच्या उड्या पडतात.

टॅग्स :सलमान खानबॉलिवूड