रणबीर कपूरच्या एका मोठ्या चित्रपटातून ऐनवेळी हकालपट्टी झाल्याचे दु:ख किती काळ टिकू शकते? कदाचित आयुष्यभर. किमान अभिनेता ब्रिजेंद्र पाल यांच्याबद्दल तरी हेच म्हणता येईल. ब्रिजेंद्र काला यांनी आपल्या १६ वर्षांच्या करिअरमध्ये अनेक हिट चित्रपटांत काम केले. सुरुवातीच्या काळात त्यांनी अगदी छोट्या भूमिका मिळाल्या. २००३ मध्ये प्रदर्शित ‘हासिल’ या चित्रपटात त्यांनी एका न्यूजपेपर वेंडरची भूमिका साकारली होती. तर ‘जब वी मेट’ यात ते टॅक्सी ड्रायव्हरच्या भूमिकेत तर ‘पान सिंग तोमर’मध्ये एका पत्रकाराची भूमिका त्यांनी वठवली होती.
अलीकडे आयएएनएसला दिलेल्या मुलाखतीत ब्रिजेंद्र काला यांनी आपल्या स्ट्रगल व करिअरबद्दल सांगितले. याचदरम्यान रणबीरच्या एका चित्रपटातून ऐनवेळी काढून टाकल्याचे दु:खही बोलून दाखवले. त्यांनी सांगितले की, एका मोठ्या चित्रपटात मला रोल मिळाला होता. मी १० दिवस शूटींगही केले होते. पण अचानक मला या चित्रपटातून काढून टाकण्यात आले. ते दु:ख मी आजही विसरू शकलेलो नाही. भूमिका नेहमीप्रमाणे छोटी होती. पण ती महत्त्वपूर्ण होती. मी स्वत: हा रोल लिहिला होता.
मी १० दिवस शूटींगही केले. आणखी १० दिवसांचे शूटींग बाकी असताना एकदिवस मी सेटवर पोहोचलो आणि आता तुम्ही या चित्रपटात नाही, असे मला सांगण्यात आले. मला या भूमिकेकडून प्रचंड अपेक्षा होत्या. पण माझा अख्खा रोल , ती भूमिकाच गाळली गेली होती. याआधी कधीही माझ्यासोबत कधीही असे काही घडले नव्हते. मला खूप त्रास झाला. यातून बाहेर पडायला मला अनेक दिवस लागलेत.’
आता हा चित्रपट कोणता होता, हा विचार तुम्ही करत असाल तर या चित्रपटाचे नाव होते, ‘बेशरम’. या चित्रपटात रणबीर कपूर लीड रोलमध्ये होता.