Join us

 शीश झुका कर...अभिनंदन...! विंग कमांडर अभिनंदन यांच्या वापसीसाठी बॉलिवूडची प्रार्थना!!

By ऑनलाइन लोकमत | Published: February 28, 2019 10:09 AM

भारतीय वायू दलाचे विंग कमांडर अभिनंदन पाकिस्तानच्या तावडीत सापडले आहेत.  संपूर्ण देश ते सुखरूप परत यावेत म्हणून प्रार्थना करतोय. बॉलिवूड सेलिब्रिटींनीही पुढे येत, अभिनंदन यांच्या वापसीसाठी प्रार्थना केली आहे.

ठळक मुद्देअभिनेत्री रेणुका शहाणे हिने पायलट अभिनंदन यांचा व्हिडिओ शेअर करणे थांबवा, असे आवाहन लोकांना केले आहे.

भारताने पुलवामा हल्ल्याचा बदला घेत पाकिस्तानच्या हद्दीत घुसून हवाई हल्ला केला. त्यानंतर, पाकिस्ताननेही भारताच्या हद्दीत घुसण्याचा अयशस्वी प्रयत्न केला. दोन्ही हल्ल्यानंतर भारत-पाकिस्तान सीमेवर तणाव वाढला आहे. त्यातच, भारतीय वायू दलाचे विंग कमांडर अभिनंदन पाकिस्तानच्या तावडीत सापडले आहेत.  संपूर्ण देश ते सुखरूप परत यावेत म्हणून प्रार्थना करतोय.  सोशल मीडियावरही अभिनंदन यांना मायदेशी परत मोहिम उघडण्यात आली आहे.   बॉलिवूड सेलिब्रिटींनीही पुढे येत, अभिनंदन यांच्या वापसीसाठी प्रार्थना केली आहे.

बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन यांनी विंग कमांडर अभिनंदन यांच्या सुरक्षित वापसीची कामना करता, तिरंग्याचा इमोजी शेअर केला आहे. ‘शीश झुका कर...अभिनंदन’, असे ट्विट त्यांनी केले आहे.

 

अभिनेते अनुपम खेर यांनी विंग कमांडर अभिनंदन यांचा फोटो शेअर करत कवितेच्या काही ओळी लिहिल्या आहेत.यह असीम, निज सीमा जाने,सागर भी तो यह पहचानेईस मिट्टी के पुतले मानव ने कभी न मानी हार,तूफानों की ओर घुमा दो नाविक निज पतवारदुनिया के हर कोने में बैठा भारतीय आपकी बहादुरी का कायल है और आपके साथ है।जय हिंदअसे ट्विट अनुपम यांनी  केले आहेत.

अभिनेत्री सुश्मिता सेन हिनेही विंग कमांडर अभिनंदन यांच्यासाठी प्रार्थना केली आहे.

दुसरीकडे अभिनेत्री रेणुका शहाणे हिने पायलट अभिनंदन यांचा व्हिडिओ शेअर करणे थांबवा, असे आवाहन लोकांना केले आहे. आपले हवाई दल संपूर्ण स्थितीशी निपटण्यासाठी सज्ज आहे.  आपल्या गैरजबाबदार वागणुकीने विंग कमांडर यांच्या कुटुंबाना त्रास होणार नाही, केवळ याची काळजी घ्या, असे ट्विट रेणुका शहाणे हिने केले आहे.

 अभिनेता विकी कौशल यानेही विंग कमांडर अभिनंदन हे सुखरूप परत येतील, यासाठी कामना केली आहे.

  विंग कमांडर अभिनंनद यांना परत आणण्यासाठी देशभर त्यानंतर देशभरातून #BringbackAbhinandan असा ट्रेंड ट्विटरवर सुरू झाला आहे.

टॅग्स :अमिताभ बच्चनएअर सर्जिकल स्ट्राईकबॉलिवूडपाकिस्तान