Join us

हनीमूनच्या रात्री नवऱ्याने करिश्मा कपूरचा मित्रांसोबत या गोष्टीसाठी केला होता सौदा, खुद्द तिनेच केला धक्कादायक खुलासा

By ऑनलाइन लोकमत | Published: May 29, 2023 7:20 PM

Karisma Kapoor And Sanjay Kapur : करिश्मा कपूर आणि संजय कपूर यांनी २००३ मध्ये लग्नगाठ बांधली होती.

बॉलिवूड अभिनेत्री करिश्मा कपूर ही फिल्म इंडस्ट्रीमध्ये टॉपच्या अभिनेत्रींपैकी म्हणून ओळखली जाते. तिने बॉलिवूडमधील एकाहून एक सरस चित्रपटांमध्ये काम केले. बॉलीवूड मध्ये तिचे अनेक चित्रपट हिट ठरले. मात्र सध्या करिष्मा कपूर चित्रपटांमध्ये जास्त ऍक्टिव्ह नसते. तिच्या लग्नानंतर तिने चित्रपट सृष्टी पासून थोडे दूर राहणे पसंत केले होते. कपूर खानदानाची मुलगी आणि बॉलीवूड मधील टॉप अभिनेत्री करिष्मा कपूरच्या वैवाहिक आयुष्यात खूप चढ-उतार आले. नुकतीच करिश्मा पूर्वाश्रमीच्या पतीबरोबर एकत्र डिनर डेटवर गेल्यामुळे नेटकऱ्यांनी तिला खूप ट्रोल केल्याचे वृत्त समोर आले होते. त्यामुळे आता त्यांच्या घटस्फोटाची चर्चा पुन्हा रंगताना दिसत आहे. 

करिश्मा आणि संजय यांनी २०१४ साली घटस्फोट घ्यायचे ठरवले होते. त्यावेळी या दोघांच्या घटस्फोटाची खूप चर्चा झाली होती. दोन्ही बाजूकडून वेगवेगळ्या गोष्टी ऐकायला मिळत होत्या. करिश्माने तिच्या सासरच्या लोकांवर हुंडा आणि मानसिक छळ यासारखे गंभीर आरोप केले होते. एवढेच नाही तर याचिकेत करिश्मा कपूरने सांगितले की, संजय कपूरचे दुसऱ्या महिलेबरोबर अनैतिक संबंध होते. ते दोघेही तेव्हा लिव्ह-इनमध्ये राहत होते. तसेच त्यांच्या हनीमूनच्या दिवशी संजयने करिश्माला त्याच्या इतर मित्रांबरोबर रात्र घालवण्यास बळजबरी केली होती. करिश्माने तिच्या घटस्फोटाच्या याचिकेत या अशा धक्कादायक गोष्टींचा खुलासा केला होता. जेव्हा करिश्माने यासाठी नकार दिला तेव्हा संजयने तिला बेदम मारल्याचेही तिने यात स्पष्ट केले होते. तिने केवळ पैशांसाठी आपल्याशी लग्न केले आहे हे संजय कपूरचे म्हणणे होते. करिश्मा आणि संजय यांनी २००३ मध्ये लग्न केले आणि यानंतर मात्र हे लग्न विचित्र वळणावर येऊन मोडले.

आम्ही कपूर आहोत आम्हाला कोणाच्याही...करिश्मा कपूरचे वडील रणधीर कपूर यांनी हिंदुस्तान टाईम्सला दिलेल्या मुलाखतीत याबाबत खुलासा केला होता. ते म्हणाले, सगळ्यांना आमची परिस्थिती ठाऊक आहे, आम्ही कपूर आहोत आम्हाला कोणाच्याही पैशांच्या मागे धावायची अजिबात गरज नाही. उलट आमच्या घरात पैशाबरोबर उत्कृष्ट कलाही आहे ज्यामुळे आम्ही आमचे पोट भरू शकतो. संजय कपूर हा अतिशय वाईट माणूस आहे, करिश्माने त्याच्याशी लग्न करावे असे मला अजिबात वाटत नव्हते. संपूर्ण दिल्लीला माहीत आहे की ही व्यक्ती कशी आहे, त्यामुळे त्याबद्दल मी आणखी काही बोलणे योग्य नाही. संजय कपूरने करिश्माला घटस्फोट दिल्यानंतर प्रिया सचदेवाशी लग्न केले. करिश्माने मात्र नंतर लग्न केले नाही आणि ती एकटी मुलांचा सांभाळ करत आहे.

टॅग्स :करिश्मा कपूर