Join us  

​अलविदा!!! कलाभवन मणि यांना श्रद्धांजली

By ऑनलाइन लोकमत | Published: March 07, 2016 11:31 AM

दक्षिण भारतीय सिनेमाचे सुप्रसिद्ध कलाकार कलाभवन मणि यांचे अखेरचे दर्शन घेण्यासाठी आज सोमवारी त्यांच्या चाहत्यांनी एकच गर्दी केली. काल ...

दक्षिण भारतीय सिनेमाचे सुप्रसिद्ध कलाकार कलाभवन मणि यांचे अखेरचे दर्शन घेण्यासाठी आज सोमवारी त्यांच्या चाहत्यांनी एकच गर्दी केली. काल कोच्चीतील एका खासगी रूग्णालयात मणि यांनी अखेरचा श्वास घेतला होता. आज त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. लीवर तसेच किडनीच्या आजाराने त्यांना ग्रासले होते. कोच्चीतील रूग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरु होते. शनिवारी गंभीर अवस्थेत त्यांना रूग्णालयात भरती करण्यात आले होते. प्रकृती बिघडल्यावर त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले. तथापि संध्याकाळी साडे सातच्या सुमारास त्यांनी अखेरचा श्वास घेतला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांच्या मृत्यूवर शोक प्रकट केला. ४५ वर्षीय मणि एक गायकही होते. सुरूवातीला ते एक आॅटोचालक होते. सुमारे दोन दशकापूर्वी मिमिक्री कलाकार म्हणून त्यांनी आपले करिअर सुरु केले आणि यानंतर मल्याळम चित्रपट उद्योगात एक विनोदी कलाकार म्हणून नावारूपास आले. यानंतर मणि यांनी दक्षिण भारतातील तामिळ व मल्याळम चित्रपटात विशेषत्वाने खलनायकाच्या भूमिका साकारल्या. यानंतर त्यांनी कधीच मागे वळून पाहिले नाही.‘वसंतीयम लक्ष्मीयम पिन्ने एनजानुम’ या चित्रपटातील त्यांची गंभीर भूमिकेसाठी त्यांचे अपार कौतुक झाले.