एका केबल ऑपरेटरला चित्रपट रिलीज होऊन तीन दिवसच उलटलेले असताना टीव्हीवर प्रसारीत केल्यामुळे अटक करण्यात आली आहे. केबल ऑपरेटरवर आरोप आहे की त्याने दाक्षिणात्य सुपरस्टार रजनीकांत यांच्या दरबार चित्रपटाचे पायरेटेड व्हर्जन टीव्हीवर प्रसारीत केले आहे आणि हे बेकायदेशीर आहे. त्यामुळे पोलिसांनी त्याला अटक केली आहे. हे प्रकरण तमीळनाडूमधील मदुराई शहरातील आहे.
इंग्रजी वेबसाईट टाइम्स ऑफ इंडियाच्या वृत्तानुसार १० जानेवारीला प्रदर्शित झालेला रजनीकांतचा चित्रपट दरबारचा पायरेटेटेड व्हर्जन टीव्हीवर प्रसारीत केला आहे. त्यानंतर दरबारची प्रोडक्शन कंपनी लायका प्रोडक्शन्सने केबल ऑपरेटरच्या विरोधात तक्रार दाखल केली. त्यानंतर पोलिसांनी सक्त कारवाई करत केबल ऑपरेटरला अटक केली आहे. विशेष बाब म्हणजे रजनीकांतचा चित्रपट दरबार चित्रपटगृहात प्रदर्शित झाल्यावर लगेच ऑनलाईन लीक झाला होता.
दरबार चित्रपटात रजनीकांत व्यतिरिक्त नयनतारा, निवेता थॉमस, योगी बाबू, प्रतीक बब्बर व सुनील शेट्टी हे कलाकार मुख्य भूमिकेत आहेत.
या चित्रपटाचे दिग्दर्शन ए.आर.मुरूगादॉसने केले आहे.