Join us

‘कॅब्रे’चा बोल्ड टीजर आऊट

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 25, 2016 21:18 IST

.‘कॅब्रे’ हा रिचा चड्डाचा येऊ घातलेला चित्रपट. यात रिचाने एका कॅब्रे डान्सरची बोल्ड भूमिका साकारलीय. 

‘गँग्स आॅफ वासेपूर’,‘फुकरे’, ‘मसान’ आणि ‘मैं और चार्ल्स’ या सारख्या चित्रपटांतून अगदीच कमी वेळात बोल्ड अ‍ॅक्ट्रेस अशी ओळख निर्माण करण्यात रिचा चड्डा यशस्वी झाली.  तिच्या बोल्ड अदांसोबतच तिच्या अभिनयाची चांगली प्रशंसा झाली. रिचाच्या आगामी चित्रपटाचा टीजर पाहून हा सिलसिला पुढेही सुरु राहिल, असे दिसतेय.‘कॅब्रे’ हा रिचाचा येऊ घातलेला चित्रपट. यात रिचाने एका कॅब्रे डान्सरची बोल्ड भूमिका साकारलीय. याचा टीचर आज शुक्रवारी आऊट झाला. यात रिचा अतिशय कामुक अदांमध्ये दिसत आहे. पूजा भट्टच्या या चित्रपटासाठी रिचा अपार कष्ट घेतेय. चित्रपटातील एका सीनमध्ये रिचाने सिगरेट ओढली. प्रत्यक्षात ‘नॉन स्मोकर’ असलेल्या रिचा यामुळे काही दिवस आजारीचं पडली. यामुळे शुटींगही काही दिवस थांबवावे लागले होते. रिचा खºया अर्थात ‘कॅब्रे’चा ‘हिरो’ आहे. तेव्हा प्रतीक्षा करूया, रिचाच्या ‘कॅब्रे’ची..!!