काल गुरुवारी प्रियंका चोप्रानेकान्स फिल्म फेस्टिवल 2019च्या रेड कार्पेटवर ग्लॅमरस एन्ट्री घेतली. शिमरी ब्लॅक आणि मरून कलचा थाई हाईस्लिट गाऊनमध्ये रेड कार्पेटवर उतरलेल्या प्रियंकाने सगळ्यांना प्रभावित केले. मोकळे केस, पिंक लिपस्टिक आणि न्यूड मेकअप अशा अवतारात प्रियंका रेड कार्पेटवर उतरली. तिचा हा लूक चाहत्यांना भावला. पण रेड कार्पेटवरील तिचे फोटो पाहून सोशल मीडियावर एक नवी चर्चा सुरु झाली.होय, प्रियंकाने घातलेल्या गाऊनमध्ये तिचे ‘बेली फॅट’ स्पष्टपणे दिसले. यानंतर प्रियंका प्रेग्नंट असल्याच्या चर्चेला उधाण आले. अनेकांनी प्रियंका निक जोनासच्या मुलाची आई बनणार असल्याचा कयास बांधला.
एका युजरने बेबी बम्प? असे लिहिले तर अन्य एका युजरने प्रियंका नक्कीच प्रेग्नंट आहे,असा दावा केला. अर्थात तूर्तास तरी पीसी यावर काहीही बोललेली नाही. त्यामुळे ती खरोखरचं प्रेग्नट आहे वा नाही, हे कळायला मार्ग नाही. यापूर्वीही प्रियंका प्रेग्नट असल्याची चर्चा झाली होती. मध्यंतरी एका इव्हेंटमध्ये प्रियंकाचे बेली फॅट पाहून अनेकांनी असाच कयास बांधला होता. अर्थात प्रियंकाची आई मधु चोप्राने या सगळ्या अफवा असल्याचे म्हटले होते. कॅमेºयाचा अँगल चुकल्याने असे झाल्याचे त्यांनी स्पष्ट केले होते.
मधु चोप्रा म्हणतात त्याप्रमाणे याहीवेळी कॅमेºयाचा अँगल बिघडला की पीसीकडे खरोखर काही गुड न्यूज आहे, हे लवकरच कळेलच. तोपर्यंत तुम्ही कान्समधील प्रियंकाचे हे फोटो पाहू शकता. प्रियंकाने गतवर्षी अमेरिकन सिंगर निक जोनाससोबत लग्न केले.यापूर्वी प्रियंका मेट गालाच्या रेड कार्पेटवर पती निक जोनाससोबत दिसली होती. तिचा हा लूक प्रचंड ड्रामॅटिक होता. यावरून सोशल मीडियावर तिची बरीच खिल्ली उडवली गेली होती.
यापूर्वी प्रियंकाचे एका इव्हेंटचे फोटो व्हायरल झाले होते. त्या फोटोंवरूनही प्रियंका प्रेग्नंट असल्याची चर्चा रंगली होती.