Join us

Cannes 2024 मध्ये रिल स्टारची हवा; स्वत:च्या हाताने तयार केलेला ड्रेस परिधान करत रेड कार्पेट गाजवलं

By ऑनलाइन लोकमत | Published: May 21, 2024 2:11 PM

सध्या सोशल मीडियावर कान्स फिल्म फेस्टिव्हलमधील फोटो मोठ्या प्रमाणात पाहायला मिळत आहेत.

Cannes Film Festival 2024 : सध्या सोशल मीडियावर कान्स फिल्म फेस्टिव्हलमधील फोटो मोठ्या प्रमाणात पाहायला मिळत आहेत. यामध्ये एका रिल स्टारच्या व्हायरल होणाऱ्या फोटोंनी  फॅशन इंडस्ट्रीत खळबळ माजली आहे. चला तर मग पाहूया कोण आहे ती...

cannes film festival 2024 ची सर्वत्र चर्चा होताना दिसतेय. मोठ-मोठे सेलेब्रिटी रेड कार्पेटवर आपला जलवा दाखवताना दिसत आहेत. आपल्या फॅशन सेन्सने त्यांनी संपूर्ण जगाला वेड लावल्याचं पाहायला मिळत आहे. बॉलिवूड अभिनेत्री ऐश्वर्या रायसह उर्वशी रौतेला या अभिनेत्रींनी देखील आपल्या सौंदर्याने चाहत्यांना घायाळ केलं. त्यातच रेड कार्पेटवर आपल्या अदाकारीने उपस्थितांचे लक्ष वेधून घेणारी रिल स्टार सगळ्यांच्या नजरेत आली. उत्तर प्रदेशमधील नॅन्सी त्यागी या इन्फ्ल्युएन्सरने आपल्या फॅशन सेन्समुळे अनेकांची मनं जिंकली आहेत.  या इवेंटमध्ये तिने  स्वत: च्या हाताने तयार केलेला डिझायनर ड्रेस पाहून सगळेच थक्क झाले आहेत. या डिझायन आऊटफिटचे वजन जवळपास २० किलो असल्याचं सांगितलं जात आहे. नॅन्सीने सोशल मीडियावर याबाबत पोस्ट शेअर करत खुलासा केला आहे. 

उत्तर प्रदेशमधील बरनवा या छोट्याशा गावातील तरूणीने अनेकांपुढे आदर्श निर्माण केला आहे. तिचा कान्स फिल्म फेस्टिव्हल २०२४ पर्यंत पोहचण्याचा प्रवास फार प्रेरणादायी आहे. 

२० किलोच्या ड्रेसची सर्वत्र चर्चा- 

७७ व्या कान्स फिल्म फेस्टिव्हल २०२४ मध्ये नॅन्सीने स्वत: च्या हाताने तयार केलेला ड्रेस परिधान करून रेड कार्पेटवर एन्ट्री घेतली. गुलाबी रंगाचा गाऊन तयार करण्यासाठी तिला ३० दिवसांचा कालावधी लागला, असं ती म्हणते. १००० मीटर कपड्याच्या वापर करून नॅन्सीने हा  हेवी गाऊन तयार केला आहे. या फिल्म फेस्टिव्हलमध्ये ब्रुटशी तिने संवाद साधला. या संवादात नॅन्सी म्हणाली की, "माझा प्रवास फार काही सोपा नव्हता. या प्रवासातील प्रत्येक क्षण माझ्यासाठी अमुल्य होता. तुमचं माझ्याबद्दल असलेलं प्रेम आणि पाठिंब्यासाठी मी तुमची आभारी आहे". 

सोशल मीडियाने केली कमाल- 

१२ वी पर्यंत शिक्षण पूर्ण करत नॅन्सीने पुढील शिक्षणासाठी दिल्लीची वाट धरली.  कोविड-१९ दरम्यान उत्पन्नाचं कोणतंही साधन हाती नसल्यामुळे तिची आर्थिक परिस्थिती प्रचंड ढासाळली. तरीही तिने हार मानली नाही. संकटांशी दोन हात करत ती लढत राहिली. घर खर्च भागवण्यासाठी नॅन्सीने शिवणकाम करायला सुरूवात केली. आपल्या कौशल्याला कल्पकतेची जोड देत तिने सोशल मीडियाचा पुरेपुरे वापर करून घेतला. सोशल मीडियावर तिने तयार केलेल्या कपड्यांचे व्हिडिओ ती पोस्ट करू लागली. तिच्या या व्हायरल पोस्टला नेटकऱ्यांचा चांगलाच प्रतिसाद मिळू  लागला. स्क्रेचपासून आऊटफिट पूर्ण करेपर्यंत संपूर्ण व्हिडिओ ती इंटरनेटवर पोस्ट करायची. एक उत्तम आणि लोकप्रिय फॅशन इनफ्ल्यूएन्सर अशी सोशल मीडियावर नॅन्सीची ख्याती आहे. 

टॅग्स :कान्स फिल्म फेस्टिवलफॅशनव्हायरल फोटोज्सोशल मीडिया