बॉलिवूडचं न्यूली वेड कपल सिड कियारा (Sid-Kiara) यांच्या लव्ह स्टोरीची सुरुवात 'शेरशाह' (Shershah) या सिनेमाच्या शूटिंग दरम्यान झाली. कारगिल युद्धात शहीद झालेल्या कॅप्टन विक्रम बत्रा (Ct Vikram Batra) यांची भूमिका सिद्धार्थ मल्होत्राने (Siddharth Malhotra) साकारली होती. तर त्यांच्या प्रेयसीची भूमिका अभिनेत्री कियारा अडवाणी (Kiara Advani) हिने साकारली होती. याचदरम्यान दोघांनी खऱ्या आयु्ष्यातील विक्रम बत्रा यांच्या कुटुंबाची भेट घेतली होती. दोघांची विक्रम बत्रा यांच्या भावाशी खास ओळख जमली होती. सिड कियाराच्या रिसेप्शनमध्ये कॅप्टन विक्रम बत्रा यांचे भाऊ विशाल बत्रा आणि कुटुंबही सामील झाले. सर्वांता एकत्रित फोटो आता सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
'शेरशाह' सिनेमाच्या टीमने कारगिलला खऱ्या लोकेशनवर जात सिनेमाचे शूट केले होते. सोबतच ते कॅप्टन विक्रम बत्रा यांच्या कुटुंबाला भेटले. इतकंच नाही तर विक्रम बत्रा यांची प्रेयसी डिंपल यांचीही कियारा अडवाणीने भेट घेतली. सिड कियाराच्या आयुष्यातील इतक्या महत्वाच्या प्रसंगी विक्रम बत्रा यांचे बंधू विशाल बत्रा आणि कुटुंबीय दाखल झाले आणि नवविवाहित जोडप्याला शुभेच्छा दिल्या. दोन दिवसांपूर्वी मुंबईतील सेंट रेगिस हॉटेलमध्ये रिसेप्शनचे आयोजन करण्यात आले होते. यासाठी विशाल बत्रा आणि कुटुंबीय सामील झाले. सिद्धार्थ मल्होत्रा फॅन क्लब या सोशल मीडिया अकाऊंटवरुन फोटो शेअर करण्यात आले आहेत.
सिड कियाराच्या आयुष्यात 'शेरशाह' या सिनेमाचा मोठा रोल आहे. याच सिनेमाच्या सेटवरुन त्यांच्या प्रेमकहाणीला सुरुवात झाली होती. आता ते लग्नबंधनात अडकले आहेत. चाहत्यांनाही प्रचंड आनंद झाला आहे.