Join us

Youtube vs TikTok Controversy वर युट्यूबर कॅरी मिनाटीचा नवा व्हिडिओ, एका दिवसात मिळाले 3 कोटी 90 लाखांहून जास्त व्हुज

By ऑनलाइन लोकमत | Published: May 19, 2020 2:23 PM

कॅरी मिनाटीच्या नव्या व्हिडिओला मिळतोय खूप जास्त रिस्पॉन्स, पहा हा व्हिडिओ

लोकप्रिय भारतीय युट्यूबर कॅरी मिनाटी म्हणजेय अजय नागर गेल्या काही दिवसांपासून सातत्याने चर्चेत येतो आहे. या मागचं कारण म्हणजे त्याचा वादग्रस्त व्हिडिओ. वीस वर्षीय अजय नागरने युट्यूबवर युट्यूब व्हर्सेस टिकटॉक असा व्हिडिओ बनवला आणि हा व्हिडिओ खूप व्हायरल झाला आणि त्यानंतर तर कॅरी मिनाटी व टिक टॉक स्टार आमिर सिद्दीकीमध्ये महायुद्ध रंगले. मात्र युट्यूब विरूद्ध टिकटॉकचा हा व्हिडीओ मापदंडाविरोधी असल्याचे सांगत युट्यूबने तो हटवला. त्यानंतर कॅरी मिनाटी खूप भावूक झाला. पण त्याच्या सपोर्टमध्ये युट्यूबचे स्टार पुढे सरसावले आहेत आणि त्याचे चाहतेदेखील त्याला समर्थन करत आहे.  #BringBackCarryMinatiVideo हा हॅशटॅग सोशल मीडियावर ट्रेंड होताना दिसत आहे.

आता कॅरी मिनाटीने नुकताच एक व्हिडिओ अपलोड केला आहे. ज्यात तो युट्यूब व्हर्सेस टिक टॉक कॉन्ट्रव्हर्सीबद्दल बोलत आहे. त्याने या व्हिडिओला STOP MAKING ASSUMPTIONS | YOUTUBE VS TIK TOK: THE END असं टायटल दिले आहे. या व्हिडिओत तो खूप इमोशनल झालेला दिसतो आहे. या व्हिडिओत तो सांगतोय की, त्याचा हा व्हिडिओ नेमका कोणत्या डायलॉगमुळे युट्यूबने हटवला हे समजले नाही. त्यानंतर त्याच्या प्रत्येक डायलॉग्जचा चुकीचा अर्थ लावला जातो आहे. तर त्याचा अर्थ वेगळाच निघणार. पण, यामागचा माझा हेतू वेगळा होता. तो समजून घ्या.

कॅरी मिनाटीच्या या व्हिडिओला खूप प्रतिसाद मिळतो आहे. एका दिवसांत या व्हिडिओला 3 कोटी 90 लाखांहून जास्त व्हुज मिळाले आहेत.

याशिवाय कॅरी मिनाटीने त्याला सपोर्ट करणाऱ्या त्याच्या चाहत्यांचे इंस्टाग्रामवर आभार मानले आहेत.

कॅरी मिनाटी युट्यूबचा सर्वाधिक लोकप्रिय स्टार आहे. त्याचे खरे नाव अजय नागर. कॉमेडियन, रॅपर आणि आता युट्यूब स्टार अशी त्याची ओळख आहे. फरीदाबादचा या अजयचे युट्यूबवर CarryMinati व CarryIsLive अशी दोन चॅनल्स आहेत़ युट्यूब करिअरसाठी कॅरीने मध्येच शिक्षण सोडले. होय, अगदी 12 वीची परीक्षा न देण्याचा निर्णय त्याने घेतला. अर्थात पुढे त्याने हे शिक्षण पूर्ण केले, हा भाग वेगळा.

अजय नागर कॅरी मिनाटी नावाने युट्यूबवर लोकप्रिय आहे. युट्यूबवर लोकांची खिल्ली उडवणारे व्हिडीओ शेअर करणे शिवाय लाईव्ह गेमिंगसाठी तो ओळखला जातो.

टॅग्स :यु ट्यूबव्हॉट्सअ‍ॅप